शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे दोन गट होणार

By admin | Updated: August 29, 2016 00:37 IST

खेड, चिपळूण स्थिर : संगमेश्वरचा एक गट कमी होणार

श्रीकांत चाळके खेड गेल्या दहा वर्षांत प्रभागनिहाय कमी होत असलेली लोकसंख्या आणि नव्याने निर्माण होत असलेल्या नगरपंचायतीमुळे विभागलेल्या प्रभागाचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर झाला आहे़ परिणामी दापोली व मंडणगडसह गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर मतदारसंघावर देखील परिणाम झाला असून, खेड आणि चिपळूण मतदारसंघ स्थिर राहिले आहेत़ मंडणगड तालुक्यात याअगोदर जिल्हा परिषदेचे तीन गट होते. ते आता दोन होणार आहेत. तीच स्थिती दापोली तालुक्याची आहे. तेथे यापूर्वी सात गट होते. ते आता सहा राहणार आहेत, तर खेड आणि चिपळूण तालुक्यांतील प्रत्येकी सात आणि नऊ होते, ते तसेच राहणार आहेत. याउलट गुहागर तालुक्यात पूर्वीचे पाच होते, त्याठिकाणी आता चार गट राहणार असून, सगमेश्वर तालुक्यातील पूर्वीच्या आठ गटांचे आता सात गट होणार आहेत़ रत्नागिरी तालुक्याचे मात्र आठ गट कमी न होता दोनने वाढले आहेत. आता रत्नागिरी तालुक्यात दहा गट होणार आहेत. याउलट लांजा आणि राजापूर तालुक्यांत पूर्वीइतकेच म्हणजे अनुक्रमे चार व सहा इतकेच गट राहणार आहेत. पंचायत समितीमध्ये खेड आणि चिपळूणचे पंचायत समितीचे गण पूर्वीप्रमाणेच म्हणजे अनुक्रमे १४ आणि १८ राहणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात मात्र पंचायत समिती गणात बदल झाला असून, पूर्वीच्या १६ गणांचे आता १४ मतदारसंघ करण्यात आले आहेत. रत्नागिरीत मात्र १६ गणांचे आता २० गण झाले आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्याला पूर्वीच्या तुलनेत यापुढे दोन पंचायत समिती सदस्य कमी होणार असून, रत्नागिरी तालुक्याला पूर्वीच्या तुलनेत आणखी चार सदस्य जादा मिळणार आहेत. याप्रमाणेच लांजा व राजापूर तालुक्यांच्या पंचायत समितीच्या पूर्वीच्या सदस्यसंख्येत काही बदल झाला नाही. पूर्वीची असलेली ८ व १२ ही सदस्यसंख्या स्थिर राहणार आहे. मंडणगड तालुक्याला सहा ऐवजी आता चार मतदारसंघ मिळणार आहेत. गुहागर पंचायत समितीची दहा सदस्य संख्या आता आठ, तर दापोली पंचायत समितीची सदस्य संख्या १२वर आली आहे.