शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत ३00 अर्ज दाखल

By admin | Updated: April 8, 2015 23:58 IST

जात पडताळणी : रत्नागिरीतील अधिकारी सिंधुदुर्गनगरीत

सिंधुदुर्गनगरी : निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी रत्नागिरी येथील जात पडताळणी समितीचे अधिकारी गेले दोन दिवस सिंधुदुर्गनगरी येथे दाखल झाले होते. गेल्या दोन दिवसांत सुमारे ३०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज सादर केले. जात पडताळणी समितीचे कार्यालय रत्नागिरी येथे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना निवडणुकीसाठी आवश्यक असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रत्नागिरी येथे जावे लागते. रत्नागिरी येथे जाण्यासाठी लागणारा विलंब, त्रास आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल असल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी ६ व ७ एप्रिल रोजी विभागीय जात पडताळणी रत्नागिरी येथील सक्षम अधिकारी जात पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले होते. पहिल्या दिवशी ६ एप्रिल रोजी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी करत सुमारे २४० जणांनी आपले जात पडताळणी प्रस्ताव सादर केले तर मंगळवारी शेवटच्या दिवशी ५० ते ६० जणांनी प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी) १0 एप्रिलला नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदतसप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून ७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ७८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. १० एप्रिलला प्राप्त अर्जाची छाननी होऊन नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीतील प्रत्यक्ष उमेदवार निश्चित होतील. त्यानंतर निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या जात पडताळणी अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.