शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटीच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: March 20, 2015 23:21 IST

सावंतवाडी नगरपालिका बैठक : राजू बेग बैठकीत आक्रमक

सावंतवाडी : आपले एवढे काम चांगले आहे की, आम्हाला सभागृहात बोलण्याची संधीच मिळत नाही, अशी कोपरखळी नगरसेवक राजू बेग यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना मारली. सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील विकासकामांना मंजुरी घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी काझी दिंडी ते आत्मेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरून बेग यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा रस्ता यापूर्वीच घेतला असल्याने बेग यांचा बार फुसका निघाला.सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक संजय पेडणेकर, विलास जाधव, अ‍ॅड. अरूण पणदूरकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, माधवी मिशाळ, क्षिप्रा सावंत, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.या बैठकीत माठेवाडा काझी दिंडी ते आत्मेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्ता निविदा प्रकियेत घेतला नसल्याचा आरोप करीत नगरसेवक राजू बेग यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपण बघितल्याशिवाय बोलता, यापूर्वी तुम्ही रस्त्यासाठी माझ्याकडे आला होता का? असा सवाल केला. त्यावर नगरसेवक टेमकर यांनी हा रस्ता या निविदा प्रकियेत असल्याचे नमूद केले. त्यानंतर नगरसेवक बेगही शांत झाले. तुमचे एवढे चांगले काम आहे की, आम्हाला बोलण्याची संधीच मिळत नाही, अशी कोपरखळीही यावेळी त्यांनी मारली. सावंतवाडीच्या पालिका बैठकीत विविध कामांना मंजुरी देण्यात आल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली. (प्रतिनिधी)मोती तलावाकाठी फुटपाथ होणारपालिकेच्या बैठकीत सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. यात तेरा कामे असून या कामांना दोन कोटी दहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहेत. यामध्ये आरपीडी हायस्कूल ते शिवप्रसाद लॉज, सबनीसवाडा रस्ता, आत्मेश्वर मंदिर ते कलावती मंदिर, मोती तलावाकाठची फुटपाथ आदी तेरा कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली आहे.