शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव

By admin | Updated: January 16, 2016 23:49 IST

नगरपंचायत आरक्षण जाहीर : सात प्रभाग खुले, ओबीसी पुरुषांसाठी दोन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, अनुसूचित जातीच्या वॉर्ड क्र. ७ मध्ये महिला आरक्षण पडले आहे तसेच सर्वसाधारण महिलांसाठी पाच प्रभाग तर ओबीसी महिलांसाठी तीन असे नऊ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. १७ पैकी ५ प्रभाग सर्वसाधारण गटासाठी तर दोन प्रभाग ओबीसी पुरुष गटासाठी आरक्षित झाले आहेत. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल आता काही दिवसांतच वाजणार असून, १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीच्या वॉर्डनिहाय आरक्षणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया शनिवारी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी रवींद्र बोंबले व नायब तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पहिल्यांदाच अनुसूचित जातीसाठी ७ क्रमांकाचा वॉर्ड निश्चित करण्यात आला असून, या वॉर्डमध्ये ९६९ लोकसंख्या आहे. त्यापैकी ४२३ एवढे मतदार आहेत. या मागासवर्गीयांच्या अनुसूचित जातीच्या ७ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये महिला आरक्षण पडले. तसेच यावेळी प्रांताधिकारी बोंबले म्हणाले की, अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी वॉर्ड नाही आहे. महिला ही सर्व आरक्षणेही येथील वॉर्डनिहाय लोकसंख्येवरून काढण्यात आलेली आहेत. या १७ जागांच्या नगरपंचायतीमध्ये नऊ महिला व आठ पुरुष उमेदवार असणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण जाहीर करण्यात आले. १- सर्वसाधारण, २- सर्वसाधारण, ३- सर्वसाधारण, ४- ओबीसी पुरुष, ५- सर्वसाधारण महिला, ६- ओबीसी पुरुष, ७ - अनु.जाती महिला, ८- सर्वसाधारण, ९- सर्वसाधारण, १०- ओबीसी महिला प्रवर्ग, ११- सर्वसाधारण, १२- सर्वसाधारण महिला, १३- सर्वसाधारण महिला, १४- सर्वसाधारण महिला, १५- ओबीसी महिला, १६- सर्वसाधारण महिला, १७ - सर्वसाधारण. यावेळी सुनील भोगटे, संजय भोगटे, विनायक राणे, संध्या तेरसे, अभय शिरसाट, राजन नाईक, बबन बोभाटे, काका कुडाळकर, राजू राऊळ, बाबल गावडे, मनसे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)