शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

वाईटपणा नजरेआड करा : मानसी

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

रत्नागिरीत रंगला ‘गमती भविष्याच्या’ कार्यक्रम

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरीतर्फे मुंबईच्या ख्यातनाम ज्योतिषी पंडित मानसी यांचा ‘गमती भविष्याच्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान परशुराम सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला.मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. तात्यासाहेब अभ्यंकर, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन व पंडित मानसी यांच्या हस्ते भगवान श्री गणेश व भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन दीपप्रज्वलन झाले. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक करुन पं. मानसी यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी मंडळाच्या वसतिगृहातील लॉ कॉलेज, गोगटे - जोगळेकर, रत्नागिरी येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कपील प्रकाश रानडे (वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक) व अक्षय संजीव कोकणे (वादविवाद स्पर्धा) विभागीय स्तर रौप्यपदक यांचा सत्कार करण्यात आला.वाईटातला चांगुलपणा डोळसपणे पाहावा आणि चांगल्यातला वाईटपणा नजरेआड करावा, असा सुखी जीवनाचा मंत्र पं. मानसी यांनी या कार्यक्रमात दिला. बारा राशींच्या गमती जमती सांगताना रास एक असली तरी दोन व्यक्तींमध्ये खूप फरक असतो. ज्योतिष एक शास्त्र आहे. त्याचा मार्गदर्शक म्हणून वापर करा. लोकांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. विनाकारण महागडे विधी, गंडेदोरे, पूजा यांच्या मागे न लागता अत्यंत कमी खर्चात आपणही स्वत: या दोषांचं निराकरण करु शकता. तसेच कालसर्पयोग, पितृदोष, वास्तूदोष, रत्न, एक नाड दोष, मंगळदोष इत्यादीबाबतच्या श्रोत्यांच्या सर्व शंकांना त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि समर्पक उत्तरे दिली.(प्रतिनिधी)