शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 27, 2015 00:22 IST

गिरीष बापट : कासार्डे येथील संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन

नांदगाव : सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते माझ्याकडे आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही. सरकारी यंत्रणांच्या चुकांमुळे गरीब लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कार्ड नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे आणि या खात्याचे स्वरूप पालटण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. या विभागाच्या विविध समस्या कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमप्रसंगी मंत्री बापट बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, राजन चिके, प्रमोद रावराणे, राजेंद्र म्हापसेकर, राजू राऊळ, संजय नकाशे, अमोल लोके उपस्थित होते.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीष बापट म्हणाले, गरीब जनता अजूनही दारिद्र्यरेषेखालील कार्डापासून वंचित आहे. श्रीमंतांचा दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये समावेश आहे. संपूर्ण यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व व्यवस्था बदलासाठी बायोमेट्रिक पद्धतीबरोबरच निरनिराळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुवा बनून काम केले पाहिजे. सरकार चालविणे सोपे काम नाही. अनेक समस्यांवर मात करून राज्याच्या विकासाच्या व समृद्धीच्या दिशेने न्यायचे आहे. त्यासाठी टीमवर्कची गरज आहे. आपला या मतदारसंघातील हक्काचा आमदार आपण निवडून आणू शकलो नाही ही सल मला बोचते आहे. याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी खूणगाठ बांधून त्यादृष्टीने सतर्क राहून आतापासूनच तयारी सुरू केली पाहिजे.आपण स्वत: प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून संवाद साधण्याचा आपला प्रयत्न आहे. जेणेकरून संघटनेच्या कार्यात चैतन्य निर्माण होईल. कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतील. यादृष्टीने आपला प्रयत्न आहे. पुन्हा मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी हसत-खेळत संवाद साधण्याबरोबर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे खेळीमेळीत दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, राजन चिके, मानसी वाळवे, आदींसह कार्यकर्त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न मांडले.माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते गिरीष बापट यांना मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. जयदेव कदम यांनी सूत्रसंचालन केले. अतुल काळसेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)एपीएल कार्डधारकांना अन्नसुरक्षा कायद्यामुळे धान्यच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सरकारी यंत्रणांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.-गिरीष बापट, अन्नपुरवठा मंत्री