शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर स्मारक उभारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 23, 2015 00:35 IST

प्रमोद जठार : मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता एमटीडीसीच्या माध्यमातून १०० कोटींचा आराखडा बनविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या सुशोभिकरणासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील खडकावर दर्यावर्दी स्वरूपातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची संकल्पना असून यासाठी आवश्यक १० कोटी रूपये निधीची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी मालवण येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येथील भाजपा कार्यालयात माजी आमदार प्रमोद जठार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, विलास हडकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, एमटीडीसीमार्फत बनविण्यात येणाऱ्या पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता निधीची मागणी आपण करणार आहोत. यामध्ये विजयदुर्ग किल्ल्यामध्ये लाईट अ‍ॅण्ड साऊंड सिस्टीम प्रोजेक्टसाठी ५ कोटी, देवगड किल्ला सुशोभिकरणसाठी ८ कोटी, वैभववाडी येथील नापणे धबधबा परिसर सुशोभिकरणासाठी २ कोटी, कुणकेश्वर मंदिरासाठी भव्य गेट, पार्कींग व्यवस्था, शौचालय सुविधा निर्माण करण्यासाठी कणकवली येथील गोपुरी आश्रम कलाग्रामसाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची संकल्पना आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील एका मोठ्या खडकावर दर्यावर्दी स्वरूपातील शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जाईल. २०१७ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यास ३५० वर्षे पूर्ण होत असून यावेळी या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल. या स्मारकासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रेरणोत्सव समितीने प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सुपूर्द करावा, असेही जठार म्हणाले. बाबा मोंडकर यांनी, मालवण नगरपालिकेतर्फे चिवला बीच येथे निर्माण करण्यात येणाऱ्या वॉटर स्पोर्टस अ‍ॅण्ड आऊटडोअर गेम्स प्रकल्पासाठीही या आराखड्यात १ कोटी रूपये निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)