शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संगीत रंगभूमी जगण्यासाठी प्रयत्न करावेत

By admin | Updated: November 21, 2015 00:20 IST

रजनी जोशी, अरविंद पिळगावकर : खल्वायन संस्थेतर्फे संगीत नाट्य कार्यशाळा

रत्नागिरी : नाट्यसंगीत शिकावे, असा पालकांचा हट्ट असतो, पण केवळ गायन, संगीत न शिकता नाटकात अभिनयही केला पाहिजे, संगीत नाटक ही जिवंत कला असून, ती अविस्मरणीय आनंद देते. जगातील एकमेव मराठी संगीत रंगभूमी जगण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रामाणिक प्रयत्न करावेत. राज्यात सर्वत्र कायमस्वरूपी नाट्यसंगीत शिबिरे घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे मत संगीत रंगभूमीवरील प्रथितयश कलाकार रजनी जोशी आणि पं. अरविंंद पिळगावकर यांनी व्यक्त केले.खल्वायन संस्था आयोजित संगीत नाट्य कार्यशाळेनिमित्त रत्नागिरीत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. रजनी जोशी म्हणाल्या की, रंगशारदा संस्थेतर्फे शुभदा दादरकर, रामदास कामत, श्रीकांत दादरकर, अर्चना कान्हेरे, ज्ञानेश पेंढारकर आदी मंडळी २००८पासून नाट्यसंगीत अभ्यासवर्गात शिकवत आहोत. दादर, ठाणे, बोरिवली, पुणे, डोंबिवली या भागातून प्रशिक्षण वर्गाला प्रतिसाद मिळतोय. यातून नाटकांना नवे कलाकार मिळताहेत. जुनी नाटके उगाळत बसण्यापेक्षा नव्या संहिता रंगमंचावर येण्याची गरज आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक नाटके रंगमंचावर येऊ शकतात. आमच्या परीने आम्ही संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, शिबिरेही आयोजित करून शिकवत आहोत.यावेळी पंडित पिळगावकर यांनी सांगितले की, शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर नाट्यसंगीत शिकताना फायदा होतो. संगीत नाटकात काम करण्यासाठी ध्येयाने प्रेरित झालेल्या कलाकारांची गरज आहे. आमच्या काळात आम्ही अशीच कामे केली. सध्या टी. व्ही., मोबाईल व झटपट प्रसिद्धीमुळे नाटक पाहायला रसिक येत नाहीत. यामुळे तोट्यात नाटक चालवणे परवडत नाही. आम्ही गाणे शिकू, पण संगीत नाटकात काम करणार नाही, असे काहीजण सांगतात. अनेक कलाकारांना नाट्यसंगीत, संगीत नाटकांमुळे यशोशिखरावर जाण्याची संधी मिळते. त्यामुळे युवा कलाकारांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. संगीत नाटकांना आज सुगीचे दिवस आहेत, त्यामुळे नाट्य कलाकारांनी संगीत नाटकातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केल्यास यश मिळेल. (प्रतिनिधी)रजनी जोशी व पिळगावकर यांनी सन १९६३मध्ये यशवंतराव होळकर या एकाच नाटकातून संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. रजनी जोशी या व्यावसायिक संगीत रंगभूमीवर १९६३पासून कार्यरत आहेत. पद्मश्री डॉ. दाजी भाटवडेकर यांच्याकडून त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. तसेच वामनराव सडोलीकर, गोविंंदराव अग्नी, निवृत्तीबुवा सरनाईक, माणिक वर्मा या दिग्गज गुरुंकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन लाभले. त्यांना नाट्यसंगीताचे प्रशिक्षण कृष्णराव घाणेकर, अनंत दामले, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मिळाले. महाराष्ट्र शासनाचा बालगंधर्व पुरस्कार, संगीत रंगभूूमीच्या प्रदीर्घ सेवेबद्दल विद्याधर गोखले पुरस्कार, छोटा गंधर्व, राम मराठे, माणिक वर्मा पुरस्कार तसेच म्महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.अरविंंद पिळगावकर यांनी १९६४ साली रंगभूमीवर पदार्पण केले. १९६७ साली संगीत वासवदत्ता हे त्यांचे संगीत रंगभूमीवरील पहिले नाटक. आजवर त्यांनी सं. स्वयंवर, विद्याहरण, सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, धाडीला राम तिने का वनी, मृच्छकटिक, कान्होपात्रा, बावनखणी, शारदा, वसंतसेना, पुण्यप्रभात, भावबंधन आदी नाटकांतून गायक नट म्हणून भूमिका केल्या. पं. के. डी. जावकर, पं. अभिषेकी, पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडून गायनाचे तसेच डॉ. दाजी भाटवडेकर यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण त्यांना मिळाले. बालगंधर्व, पं. अभिषेकी, पं. दिनानाथ मंगेशकर रंग गौरव, प्रदीर्घ नाट्य सेवा गौरव, केशवराव भोसले आदी पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.