शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

घटना बदलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 10, 2015 23:50 IST

भाई जगताप : महाआघाडीचा मंडणगडात विजय मेळावा

मंडणगड : केंद्र शासनाला सत्तेचा माज आल्याने या देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न नव्हे; तर संघाकडून त्यांचे प्रारुपही तयार आहे, त्यांना हवा तसा इतिहास लिहिण्याचे काम सुरु आहे, पण या देशातील सर्वधर्म समभावाचा, काँग्रेसी विचार शासनाला हे करण्यापासून रोखणार आहे. बिहारमधील निवडणुकीत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. देशातील १३० कोटी जनतेचे भवितव्य जनता स्वत: ठरवेल, असे प्रतिपादन मंडणगड येथील विजय मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते भाई जगताप यांनी केले. नगरपंचायत निवडणुकीत महाआघाआडीला मिळालेल्या निर्भेळ यशानंतर महाआघाडीच्यावतीने मंडणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जगताप उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र शासनावर टीका केली. मंडणगड शहरात महाआघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल आमदार संजय कदम यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, येथील जनतेची पंचवीस वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. मतदारांना कुणी गृहीत धरु नका, ते हुशार असतात. ते बदलाच्या प्रतीक्षेत होते, आमदारांच्या रुपाने त्यांना योग्य पर्याय सापडल्याने सर्व बंधने झुगारून लोकांनी महाआघाडीला साथ दिली. राज्य व केंद्र शासनाने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, त्यामुळे जनता त्यांची जागा दाखवून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, स. तु. कदम, रमेश दळवी, जयवंत जालगावकर, भाई पोस्टुरे, वैभव कोकाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर संतोष मांढरे, राजा लेंढे, समद मांडलेकर, रिपाइंचे सिध्दार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, सुभाष तांबे, गणेश रूखे, सखाराम मर्चंडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंझीर दाभीळकर, कादीर बुरोंडकर, संदेश चिले, अनिल रटाटे, अनिल घरटकर, चेतन सातोपे, राकेश साळुंखे, अंकुश सावर्डेकर, गणेश सावर्डेकर, नरेश बैकर, महेश कासारे आदी यावेळी नवनिर्वाचीत नगरसेवकांचा आमदार संजय कदम व भाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)आमदारांचे कौतुक : मंडणगड पॅटर्न राज्यातआगामी काळात सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडीचा मंडणगड पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवण्याचा मनोदय प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार संजय कदम यांच्या रणनीतीचे कौतुक केले.आमदारांचे कौतुक : मंडणगड पॅटर्न राज्यातआगामी काळात सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडीचा मंडणगड पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवण्याचा मनोदय प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार संजय कदम यांच्या रणनीतीचे कौतुक केले.प्रतीक्षा संपलीमंडणगडमध्ये गेली २५ वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत सेनेचे पानिपत करत जनतेची २५ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.संघाकडून घटना बदलण्याची प्रारूपही तयार आहे.हवा तसा इतिहास लिहिण्याचे काम सुरू. राज्य व केंद्र शासनावर जोरदार टीका. बंधने झुगारून लोकांनी महाआघाडीला दिली साथ.