शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

बांद्यातील कालव्यात मातीसह झाडी

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : साफसफाईअभावी कालव्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता

बांदा : बांदा येथून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्याची साफसफाईअभावी पूर्णपणे दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी कालव्यात माती कोसळली आहे. यावर्षी कालव्यातून पाणी सोडताना कालव्याची सफाई करणे गरजेचे आहे, अन्यथा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बदलून तो फुटण्याचीही शक्यता आहे. बांदा परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्यासाठी तिलारीचे पाणी या परिसरात शाखा कालव्याच्या माध्यमातून आणण्यात आले आहे. मात्र, ठिकठिकाणी निकृष्ट काम झाल्याने या शाखा कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. दरवर्षी या कालव्याची दुरवस्थेत सतत वाढ होत आहे. सटमटवाडी येथे कालव्यावर दरड कोसळल्याने येथील कालवा धोकादायक बनला आहे. शिवाय निकृष्ट बांधकामानेही कालव्याला सुरुवातीपासूनच तडे गेले आहेत. मे २0१0 साली सटमटवाडी येथे पाणी चाचणी घेतानाच कालवा फुटला होता. यावर प्रशासनावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रशासन मात्र मूग गिळून गप्पच राहिले. त्यानंतर सटमटवाडी येथे सातत्याने कालव्यावर दरड कोसळल्याने कालव्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. या कालव्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी या कालव्यातील दरडीची माती न हटविल्यास कालवा कोसळण्याची शक्यता होती. या वृत्ताची दखल घेत कालवा विभागाने तातडीने कालव्यातील माती पावसाळ्यापूर्वी हटविली होती. मात्र, पावसाळ्यात पुन्हा या कालव्याची दुरवस्था झाली आहे.कालव्यामध्ये जंगली झाडांची वाढ झाली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. मात्र, गतवर्षी कालव्याची दुरुस्ती न करताच कालवा विभागाने मे महिन्याच्या अखेरीस या शाखा कालव्यातून डोंगरपाल येथून पाणी सोडले होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी पाणी सोडताना बांदा-सटमटवाडी येथे कालवा फुटल्याने त्यावेळी कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले....अन्यथा पाण्याचा अपव्यययावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक जाणवणार असल्याने यावर्षी कालव्यातील पाणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, कालव्याची डागडुजी तसेच साफसफाई करूनच कालवा विभागाने पाणी सोडण्याची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे कालव्यातील कचरा व मातीची साफसफाई तत्काळ करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. कालव्यातील पाणी दूषितकचऱ्यामुळे कालव्यातील पाणी पूर्णपणे दूषित झाले होते. कालव्याची दुरवस्था झाल्याने कालव्यातून काही ठिकाणी पाणी झिरपत असल्याने विहिरींमधील पाणी गढूळ झाल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती.