शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेकडून वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2017 17:14 IST

अखत्यारीतील सर्व संस्थांच्या आवारातील वृक्षगणना करणार : रेश्मा सावंत

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी,दि.0२ : शासनाची ४ कोटी वृक्ष लागवड योजना व कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत व उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते जिल्हा औषध भांडार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आवारात जिल्हास्तरीय वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता बागल, लेखाधिकारी कारंडे, जिल्हा आरसीएच अधिकारी संदेश कांबळे, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात प्रत्येकी किमान २५, आरोग्य उपकेंद्र आवारात जागेच्या उपलब्धतेनुसार किमान ५ व अंगणवाडी केंद्राचे ठिकाणी प्रामुख्याने औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व संस्था - प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, पंचायत समिती इत्यादी येथील वृक्षगणना करण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी वृक्ष रजिस्टर ठेवण्यात येणार असून पुढील वर्षी नव्याने लागवड केलेल्या वृक्षांची पडताळणी केली जाणार असल्याचे अध्यक्षा सावंत मॅडम यांनी सूचित केले आहे.