शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मांडवी’वर झाड कोसळले

By admin | Updated: July 3, 2016 23:32 IST

इंजिनचे नुकसान : जीवितहानी नाही; खेड स्थानकात तपासणी

खेड : मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनच्या मागे असणाऱ्या वातानुकूलित बोगीवर झाड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी आणि वीर स्थानकादरम्यान सापे वामने गावाच्या हद्दीमध्ये रविवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे झाड पडल्याने इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत इंजिनच्या मागील बोगीचे मोठे नुकसान न झाल्याने तेच इंजिन वापरून ही गाडी मार्गस्थ झाली. खेडमध्ये ही गाडी दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास आली. तेथे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. कोणा प्रवाशांना दुखापत झाली आहे का, याची माहिती घेतल्यानंतर ही गाडी साडेतीन वाजता पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे या मार्गावरील मांडवी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस ११.४० वाजता वीर स्थानकातून निघाली होती. करंजाडी आणि वीर स्थानकादरम्यान सापे वामने गावच्या हद्दीत रूळाच्या नजीक असलेले जुनाट वडाचे झाड गाडीच्या इंजिनवर कोसळले. हे झाड महाकाय होते. या घटनेमुळे गाडीच्या इंजिनलाही हादरा बसला. मात्र, झाड पूर्णपणे इंजिनवर न पडता इंजिनला घासल्याने इंजिन सुरक्षित राहिले; पण इंजिनला मोठा हादरा बसला आणि इंजिनच्या सर्व काचा फुटल्या. हेच झाड पूर्णपणे इंजिनवर पडले असते तर किंवा रेल्वे रूळावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. इंजिन सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर ही गाडी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. पुढे खेड स्थानकात पूर्ण तपासणी झाल्यानंतर गाडी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. २७ जून रोजी कामथे घाटात राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याची घटना ताजी असतानाच आता सापे वामने गावाजवळ ही दुर्घटना घडल्याने गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले. (प्रतिनिधी)