सिंधुदुर्गनगरी दि. २४ : दिनांक ६ ते २८ आक्टोबर २0१७ या कालावधीत भारतात १७ वषार्खालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून एकूण सामन्यापैकी ६ सामने नवी मुंबई येथे डी. वाय. पाटील स्टेडीअम नवी मुंबई येथे भरवण्यात येणार आहे.या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक मुलांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे. यासाठी महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलियन अंतर्गत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४३ माध्यमिक शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना फुटबॉल विषयी प्राथमिक माहिती व्हावी. यासाठी क्रीडा शिक्षकाचे तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या समन्वयाने करण्यात आले आहे.हे प्रशिक्षण हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २२ आॅगस्ट २0१७ रोजी सकाळी १0 ते सायं ५ या वेळेत करण्यात आले आहे. यामध्ये कळसुलकर हायस्कुल सावंतवाडी, वेंगर्ला- वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला, कुडाळ - कुडाळ हायस्कुल कुडाळ, दोडामार्ग- न्यु इंग्लिश स्कूल भेडशी दोडामार्ग, मालवण- अ.शि. दे टोपीवाला हायस्कुल मालवण, कणकवली- विद्यामंदीर प्रशाला स्कुल, कणकवली, वैभववाडी - अर्जुनराव रावराणे हायस्कुल वैभववाडी, देवगड- एस.एम.जी. हायस्कुल देवगड या शाळांचा समावेश आहे.
महाराष्ट्र फुटबॉल मिशन अंतर्गत क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 4:01 PM