शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे दुपदरीकरण जूनपासून : गीते

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

महामार्ग चौपदरीकरण प्रारंभ आॅक्टोबरमध्ये

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आॅक्टोबर २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल. हे काम २०१७ पर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा प्रारंभ जून २०१५ मध्ये रोहा व सावंतवाडी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे दिली.  केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात बुधवारी आयोजित जनकल्याण पर्व मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून अनंत गीते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. त्यावेळी गीते यांनी वर्षभरातील कोकणसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम ४२०० कोटी खर्चाच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पास मंजुरी दिली. या महामार्गावर आतापर्यंत हजारो प्रवाशांचा बळी गेला आहे. चौपदरीकरणाने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. आधीच्या सरकारने केवळ बीओटी तत्त्वावर हे काम करण्याची घोषणा केली. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर स्वनिधीतून हे चौपदरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम आधीच्या सरकारने बीओटी तत्त्वावर करावयास दिले होते. ते अपूर्ण होते. आता ते कामही शासनाने ताब्यात घेतले आहे. या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच कमीत कमी विस्थापन व शंभर टक्के पुनर्वसन यावर भर दिला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास काही ठिकाणी पर्यायी मार्ग बनविण्याचीही तयारी आहे, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला येत्या जूनमध्ये प्रारंभ होणार आहे. दुपदरीकरण झाल्यावर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल व वेळही वाचेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)इंदापूर ते झाराप चौपदरीकरण कामाचे दहा टप्पे करण्यात आले आहेत. मोजणी, संपादन काम पूर्ण होताच येत्या आॅक्टोबरमध्ये सर्व टप्प्यांच्या निविदा एकाचवेळी काढल्या जाणार आहेत. एकाचवेळी सर्व टप्प्यांतील रस्ता चौपदरीकरणाची कामे सुरू केली जाणार आहेत.लोटेत २४०० कोटींचा कागदनिर्मिती प्रकल्पजिल्ह्यातील लोटे येथे २४०० कोेटींचा पेपर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी कोकणातील जमिनीतून बांबू उत्पादन घेतले जाणार आहे. तसेच घाटमाथ्यावर व जवळच्या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्यांतील उसाचे चिपाड हा कच्चा माल म्हणून वापरला जाणार आहे, असे गीते म्हणाले.