शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मठ मार्गावरील वाहतूक ठप्प

By admin | Updated: July 17, 2016 23:49 IST

आकेशियाचे झाड कोसळले : वीज खांबाच्या तारा तुटून नुकसान

वेंगुर्ले : वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे रविवारी आकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीज खांबाच्या तारा तुटून नुकसान झाले. वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे सकाळी ८.३० च्या सुमारास रस्त्यालगत असलेले आकाशीचे भले मोठे झाड विजेच्या तारांवर पडून रस्त्यावर कोसळले. त्यामुळे सुमारे एक तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आकाशीचे झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने तारा तुटून तसेच काही विद्युत पोलही वाकल्याने वीज मंडळाचे नुकसान झाले. कुडाळहून वेंगुर्लेकडे येणाऱ्या बस गाड्या वेतोरे येथून खानोली-दाभोली मार्गे वेंगुर्ले येथे वळविण्यात आल्या. झाड पडल्याचे वृत्त समजताच वायरमन दिलीप कावले, बांधकाम स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक यशवंत कांडरकर यांच्यासह बांधकाम कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सरपंच नित्यानंद शेणई, सत्यवान बोवलेकर, मनोहर बोवलेकर, भाऊ बोवलेकर, ज्ञानेभर बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, महेश सावंत, मनीष बोवलेकर, भूषण बोवलेकर, उत्तम बोवलेकर, वासुदेव बोवलेकर या ग्रामस्थांनी त्वरित झाड बाजूला करुन मार्ग वाहतूकीस मोकळा केला. (प्रतिनिधी)