शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक मच्छिमारांचे आंदोलन!

By admin | Updated: September 16, 2016 23:48 IST

तहसीलदार, मत्स्य विभागाला निवेदन : पर्ससीन मासेमारीवर कारवाई करावी

वेंगुर्ले : शासनाने पर्ससीननेट बोटधारकांना काही नियम ठरवून दिलेले असताना या नियमांचे उल्लंघन करून वेंंगुर्ले तालुक्यात पर्ससीननेट धारकांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांंवर अन्याय होत आहे. याबाबत पर्ससीन मासेमारीवर नियमानुसार कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उभादांडा-मूठ, कुर्लेवाडी भागातील सुमारे १00 पारंपरिक मच्छिमारांनी वेंगुर्ले तहसीलदार व मत्स्य विभागाला निवेदनातून दिला आहे. दरम्यान, दोन दिवस मासेमारी बंद ठेवून पारंपरिक मच्छिमारांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही वेंगुर्ले तालुक्यात गेली कित्येक वर्षे पारंपरिक मच्छिमारी हा व्यवसाय करत असून, आम्हाला असंख्य प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आज नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे चालणारी पर्ससीननेट मासेमारी पारंपरिक मच्छिमारांच्या जिवावर बेतत आहे.शासनाने दिलेल्या नियमांचे ते उल्लंघन करून तालुक्यात पर्ससीननेट मच्छिमार अनधिकृतरित्या बिनधिक्कतपणे मच्छिमारी करीत आहेत. केवळ आपल्या अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली हा व्यवसाय सुरू असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. तालुक्यात १० वाव खोलीच्या आत या पर्ससीननेट नौका राजरोसपणे मासेमारी करीत आहेत. यावर नियंत्रण ठेवणे आपले कर्तव्य असताना आपण याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. पर्ससीननेट मच्छिमार आपली मासळी दलालांऐवजी मासे मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतात. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या माशांना चांगला भाव मिळत नसून आपल्यावर उपासमारीची पाळी आली आहे व आपण केवळ या प्रकारात बघ्याची भूमिका घेत आहात. याप्रकरणी आम्हा पारंपरिक मच्छिमारांना योग्य ती मदत न केल्यास मालवणसारखा प्रसंग वेंगुर्ले तालुक्यातही उद्भवूू शकतो. याबाबत आपल्या अधिकाराखाली योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील होणाऱ्या गंभीर परिणामांना आपण जबाबदार राहणार आहात, असे निवेदनात नमूद करून तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी पारंपरिक मच्छिमारांनी निवेदनाद्वारे दिला. (प्रतिनिधी)मासेमारी बंद ठेवून निषेधवेंंगुर्ले तालुक्यात पर्ससीननेटधारकांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांंवर अन्याय होत आहे. या विरोधात संबंधित प्रशासनाने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. दोन दिवस मासेमारी बंद ठेवून पारंपरिक मच्छिमारांनी या प्रकरणाचा निषेधही केला आहे.