शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

समुद्री वादळाचा पर्यटनाला फटका

By admin | Updated: October 12, 2015 00:55 IST

जोर कायम : मासेमारीवरही परिणाम

मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. तब्बल चार दिवस उलटले तरीही वादळाचा जोर कायम असल्याने रविवारी सागरी पर्यटनाला मोठा फटका बसला. समुद्र खवळल्याने किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आदी पर्यटन सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मालवणात पर्यटनासाठी आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांची मोठी निराशा झाली होती. दरम्यान, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा व धोक्याचा लाल बावटा ७२ तास उलटले तरी आजही कायम आहे. समुद्री वादळामुळे नौका सुरक्षित बंदरात स्थिरावल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. मालवण बंदरात आश्रयासाठी आलेल्या परराज्यातील ट्रॉलर्सपैकी चार ट्रॉलर्सने परतीचा मार्ग धरल्याचे मच्छिमारांतून बोलले जात होते. बुधवारी रात्रीपासून समुद्रात घोंगावणारे वादळ तीव्र झाले आहे. वादळसदृश स्थितीमुळे मालवण बंदरात आश्रयासाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्स रविवारी चौथ्या दिवशीही बंदरात स्थिरावले होते, तर त्या राज्यातील किनारपट्टीवरून वादळ वरच्या दिशेने सरकल्याने मालवण बंदरातील काही बोटींनी परतीचा मार्ग धरल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)किल्ले सिंधुदुर्ग दर्शन व स्कुबा डायव्हिंग बंद मालवणचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. पर्यटकांची संख्याही वाढली आहे. रविवारी किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी दोन प्रवासी होड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर वादळी हवामान व समुद्र खवळलेला असल्याने किल्ले दर्शन बंद करण्यात आले, तर शनिवारी सायंकाळपासून स्कुबा, स्नॉर्कलिंग सागरी क्रीडाप्रकार बंद होते. वादळी वाऱ्यांचा जोर पावसासह येत्या २४ तासांत कायम राहणार असल्याचा इशारा आहे. बंदर विभागाने शुक्रवारी लावलेला समुद्रातील धोक्याचा बावटा रविवारीही कायम ठेवला होता.यासह समुद्रात ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहतील असा इशाराही देताना मच्छिमारांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. मच्छिमारांच्या जाळीत अपेक्षित मासळी मिळत असताना समुद्री वादळामुळे यावर मोठा परिणाम झाला आहे.