शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाट, दाजीपुरात पर्यटकांची रिघ

By admin | Updated: July 10, 2016 01:43 IST

वर्षा पर्यटन : अनेकजण घेताहेत सुट्टीचा आनंद; दोन्ही घाटातील धबधबे फेसाळले

निकेत पावसकर--  नांदगाव --कोकणातील अनेक ठिकाणी पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी अप्रतिम स्थळे असून निसर्गनिर्मित असल्याने त्यात वेगळीच निसर्गाच्या कलाकृतीची झालर पहायला मिळते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण सुट्टीचा आनंद अशा विविध निसर्गनिर्मित पर्यटनस्थळी घेताना दिसतात. फोंडाघाटातून जाताना आणि दाजीपूर या ठिकाणी पर्यटकांची रिघ लागलेली दिसते. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ सोडल्यावर अवघ्या काही अंतरावर हिरव्यागार गर्द झाडीत, मंद वारा आणि धुके यामधून झुळझुळ वाहणारे उंच कड्यावरून पडणारे तुषार असे अप्रतिम चित्र पहायला आणि अनुभवायला मिळते. यामुळे घाट परिसर वर्षा पर्यटनासाठी जणूकाही नटलेला दिसतो. फोंडाघाटच्या माथ्यावर एका ठिकाणी सिमेंट बंधारा बांधण्यात आला असून तो उंचावर असल्याने त्यावरून पडणारे पाणी धबधब्याचे नेत्रसुख देते. खाली फेसाळणारे पाणी नक्कीच आपल्याकडे खेचताना दिसते. यामुळे आपसूक येथून प्रवास करणारे पर्यटक व खास वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या मंडळींच्या नजरा या धबधब्याकडे वळतात. यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आंबोली, बावडा घाटाबरोबर फोंडाघाटही सध्या वर्षा पर्यटनासाठी आकर्षक ठरत आहे. सध्या फोंडाघाटात कड्याकपाऱ्यातून उंचावर पडणारे तुषार झेलल्यानंतर पर्यटकांची पावले पुढे दाजीपूर अभयारण्याकडील ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धबधब्याकडे वळतात. फोंडाघाटानंतर पर्यटक पुढे दाजीपूर येथील धबधब्याला पसंती देत आहेत. सगळीकडे सुन्न परिसर, शांती शितल वारा, उंचावरून पडणारे धबधब्याच्या पाण्याचा आवाज आवाज असा परिसर दाजीपूर येथील धबधब्याचा असून देवगड निपाणी राज्यमार्गावरून जाताना घाट संपल्यानंतर काहीच अंतरावर दाजीपूर स्टॅँडजवळून आतमध्ये ४ किलोमीटरवर असणाऱ्या धबधब्याकडे पर्यटकांची पावले सध्या वळताना दिसत आहेत. फोंडाघाट संपल्यानंतर असणारी स्वागताची कमान ज्या ठिकाणी आहे त्याच्याच बाजूला थोडा अंतर डोंगर चढल्यानंतर तेथून वरती गेल्यानंतर एक लोखंडी टॉवर बांधला असून यावरून आपणास संपूर्ण फोंडाघाट तसेच त्याच्या परिसरातील गावे, घरे व अवघड वळणाची वाट काढत जाणारी वाहने पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. सोसाट्याचा वारा व निसर्ग सौंदर्य पाहताना एक वेगळीच अनुभूती येते. असा हा वर्षा पर्यटनासाठी सध्या फोंडाघाट सज्ज असून सध्या पर्यटकांची पसंती बनला आहे. भविष्यात जिल्ह्यातील आंबोली, सावडाव या ठिंकाणी होणारी गर्दी पाहता बरेचजण फोंडाघाटकडे वळताना दिसत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आस्वादशांत, शितल असे उंचावरून पडणारे पाणी पाहता यावे असा निसर्गाचा आविष्कार देखणे रूप असून त्याच्या सौंदर्याची भुरळ सध्या सर्वांनाच पडताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यावर पर्यटक वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. आपण बनवून आणलेल्या विविध पदार्थांची रेलचेल सध्या फोंडाघाट परिसरात पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेताना आढळतात. वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित असे ठिकाण सध्या फोंडाघाट परिसर परिचित असून यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे.निसर्गाच्या सानिध्यात आस्वादशांत, शितल असे उंचावरून पडणारे पाणी पाहता यावे असा निसर्गाचा आविष्कार देखणे रूप असून त्याच्या सौंदर्याची भुरळ सध्या सर्वांनाच पडताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यावर पर्यटक वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. आपण बनवून आणलेल्या विविध पदार्थांची रेलचेल सध्या फोंडाघाट परिसरात पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेताना आढळतात. वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित असे ठिकाण सध्या फोंडाघाट परिसर परिचित असून यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे.