शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत पर्यटन स्थळांना झळाळी

By admin | Updated: October 6, 2015 00:29 IST

आवश्यक सोयी पुरविणार : विकास कृती समितीला मदतीचे आश्वासन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वास्तूंची पर्यटकांना ओळख व्हावी व शहरातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी सावंतवाडी नगर परिषदेने पर्यटन वेबसाईट तयार केली आहे. शहरातील शिल्पग्राम व मोती तलावात बोटींग सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन वाढीसाठी नगर परिषद कटीबद्ध आहे, अशी ग्वाही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.सावंतवाडी पर्यटन विकास कृती समिती व व्यापारी संघाने पर्यटन वाढीसाठी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. यावेळी जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, आनंद नेवगी, डी. के. सावंत, पुंडलिक दळवी, पुखराज पुरोहित, जितू पंडित, संजय गावडे, दिलीप भालेकर, भारद्वाज पुरोहित, देवेंद्र मोर्ये, गुरूदास देवस्थळी, संतोष सावंत आदी उपस्थित होते. झाराप - पत्रादेवी महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्याने पर्यटकांची वर्दळ शहरात खूप कमी प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी दोन दिवसांपूर्वी व्यापारी संघाने कृती समिती स्थापन केली. या समितीने नगराध्यक्ष साळगावकर यांची भेट घेऊन पर्यटन वाढीबाबत चर्चा केली. यामध्ये शहरातील बंद प्रकल्प सुरू करणे, ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिका छापणे, शहरातील पर्यटन स्थळांची माहिती दर्शवणारे मोठे फलक लावणे, तलावातील बोटींग सुविधा सुरू करणे असे विविध प्रकल्प सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पर्यटन वाढीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले की, शहरात सध्या येणारे पर्यटक हे मळगावमार्गे सावंतवाडीत येतात. त्यामुळे शहरातील हॉटेल मँगो नं. २ ते मळगावपर्यंतच्या रस्त्याचे रू ंदीकरण करण्यात येईल. तसेच त्या मार्गावर दिवे (यलो लॅम्प) लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे शिल्पग्राम गेली कित्येक वर्ष सुरू आहे. हा प्रकल्प आता ३० वर्षांच्या करार तत्त्वावर देऊन सुरू करण्यात येणार आहे. मोती तलावातील बोटींग सुविधाही लवकरच सुरू करुन सावंतवाडीचा चेहरामोहरा बदलण्यात येईल जेणेकरून पर्यटक आकर्षित होईल, अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली. (वार्ताहर)शहरातील पार्कींग अडथळा हा व्यापाऱ्यांच्याच गाड्यांमुळे होतो. आपल्या दुकानासमोर चार-चार गाड्या, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने लावून ठेवली जातात. यामुळे पर्यटकांना गाड्या पार्कींगसाठी जागा राहत नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच लाकडी खेळण्यांची दुकाने रविवारी सुरू ठेवणे आवश्यक असल्याचेही साळगावकर यांनी सांगितले.सुलभ शौचालय चालविण्यास घ्या शहरात सुलभ शौचालय चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करा व नगर परिषदेत एकही रूपया भरू नका. शहरात कितीतरी सुलभ शौचालये सुरू आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील कोणीही हे सुलभ शौचालय चालवण्यास घ्यावे व स्वत:चा उदरनिर्वाह करावा. नगर परिषदेत एकही रूपया भरू नका, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना केले.पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिकाशहरातील पर्यटन स्थळांचा आढावा घेण्यासाठी कृती समिती व्यापारी व नगर परिषदेने एकत्रित भेट देऊन माहिती घेण्याचा कार्यक्रम करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. तसेच पर्यटनस्थळांची माहिती पुस्तिका छापण्याचे कामही नगर परिषदेने हाती घेतले आहे.सावंतवाडी पालिकेने केली पर्यटन वेबसाईट तयार.मोती तलावासह शिल्पग्राममध्येही लवकरच बोटींग सुविधा.पर्यटन स्थळांची माहिती फलकाव्दारे मिळणार.मळगावपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार.