शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन बारमाही उत्पन्न देणारा उद्योग

By admin | Updated: February 12, 2015 00:34 IST

आर. पी. निर्मळ : वालावल येथे शेतकरी मेळावा

कुडाळ : शासनाच्या विविध योजनांची सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. पर्यटन हा १२ महिने उत्पन्न देणारा उद्योग असून त्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ यांनी केले. वालावल येथे मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वालावलचे सरपंच राजेश प्रभू, शिवसेना शाखाप्रमुख संजोग साळसकर, ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष घनशाम वालावलकर, आदी उपस्थित होते. मेळाव्याची प्रस्तावना करताना चौधरी यांनी मेळाव्याची उद्दिष्ट्ये शेतकऱ्यांसमोर मांडली. सरपंच राजेश प्रभू यांनी, गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता ग्रामपंचायतीमार्फत लागणारे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, गावातील तरुणांचे शेतकरी गट बनवून त्यांना इतर राज्यातील शेतीपूरक प्रकल्प दाखविणे आवश्यक आहे. सभाध्यक्ष अतुल बंगे यांनी, लक्ष्मीनारायण तलावातून पाझरणारे पाणी बंद करून त्या पाण्याचा उपयोग बाराही महिने शेतकऱ्यांना कसा होईल, यासाठी केंद्राचे पर्यटनमंत्री रवी नाईक यांच्या माध्यमातून पर्यटनाच्या हेडखाली निधी आणून तलावातील गाळ काढून, त्याचे सुशोभीकरण व चारी बाजूंनी जॉगिंग ट्रॅक करण्याकरिता चौधरी ट्रस्टच्या सहकार्यातून प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्यावतीने विष्णू वालावलकर, नाथा हिंदळेकर, मीनानाथ कोचरेकर यांनी विचार मांडले. मेळाव्याचे प्रास्ताविक व आभार संदीप साळसकर यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी दादू कोळंबकर, संतोष मुणगेकर, सुनील करवडकर, सागर वालावलकर, महेन जाधव, चैतन्य वालावलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)