शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन माहिती केंद्राचा तिढा कायम

By admin | Updated: January 14, 2015 23:52 IST

मालवण येथील प्रकल्प : मच्छिमार महिलांचा कडाडून विरोध

मालवण : मालवण दांडी आवार येथे खारलॅण्ड विभागाच्या सहा इमारतींमध्ये उभारण्यात येणाऱ्या युएनडीपीच्या पर्यटन माहिती केंद्राचा तिढा अद्याप सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या इमारती स्थानिक मच्छिमार महिलांच्या वापरात असून कांदळवन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत या महिलांनी पर्यटन माहिती केंद्राला कडाडून विरोध केला. युएनडीपीच्या पर्यटन माहिती केंद्रामुळे आम्ही विस्थापित होऊ, अशी भीती व्यक्त करीत मच्छिमार महिलांनी बैठक अर्धवट सोडून निघून जाणे पसंत केले.संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सागरी जैवविविधतेचे रक्षण, संवर्धन व त्यातून शाश्वत रोजगार निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत दांडी आवार येथे खारलॅण्ड विभागाच्या अखत्यारितील सहा इमारतींमध्ये पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या इमारती येथील स्थानिक मच्छिमार महिलांच्या वापरात असल्याने या महिलांशी चर्चा करण्यासाठी आज कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक व प्रकल्प प्रमुख एन. वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प समन्वयक पार्थो घोष, युएनडीपीचे आर्थिक व सामाजिक सल्लागार सुहेल जामदार, सागरी संशोधक मार्विन फर्नांडीस, मच्छिमार नेते रमेश धुरी, विकी तोरस्कर, छोटू सावजी, रूपेश प्रभू, मेघनाद धुरी, घारे, रोहित सावंत यांच्यासह मच्छिमार महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)वादग्रस्त इमारतींचे हस्तांतरण नाहीकेंद्र सरकारच्या खारलॅण्ड विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यात ११ मच्छिमार आवारे आहेत. ही मासळी सुकविण्याची आवारे सध्या मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यामुळे येथील वादग्रस्त इमारती मत्स्य विभाग परस्पर प्रकल्पकर्त्यांकडे हस्तांतरीत करू शकत नाहीत.- मेघनाद धुरीमच्छिमार नेते मालवणभारतातील एकमेव माहिती केंद्रदांडी आवार येथे उभारण्यात येणारे माहिती केंद्र हे भारतातील एकमेव दर्जेदार व अद्ययावत माहिती केंद्र ठरणार आहे. २०१६ पर्यंत युएनडीपीच्या प्रकल्पाची मुदत असून यानंतर येथील पर्यटन माहिती केंद्र स्थानिक संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार आहे.- एन. वासुदेवनकांदळवन वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक...तर त्याला आमचा विरोधच राहीलस्थानिकांच्या हिताच्या प्रकल्पांचे सर्व मच्छिमारांच्यावतीने आम्ही स्वागतच करू. मात्र, स्थानिकांना विस्थापित करून कोणताही प्रकल्प राबविला जात असेल तर त्याला आमचा ठाम विरोध राहील. पर्यटन माहिती केंद्राचा अद्ययावत आराखडा स्थानिकांना सादर करण्यात यावा.- छोटू सावजीमच्छिमार नेते, मालवणमाहिती केंद्राला महिलांचा विरोधप्रकल्पप्रमुख एन. वासुदेवन पर्यटन माहिती केंद्राची उपयुक्तता स्पष्ट करीत असताना स्थानिक मच्छिमार महिलांनी पर्यटन माहिती केंद्राला कडाडून विरोध केला. दांडी आवार येथील खारलॅण्ड विभागाच्या अखत्यारीतील सहा इमारती या आमच्या मत्स्य व्यवसायासाठी वापरायच्या असून या इमारतीत युएनडीपीने पर्यटन माहिती केंद्र उभारल्यास आम्ही विस्थापित होऊ, अशी भीती मच्छिमार महिलांनी उपस्थित केली.