शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तारकर्ली, देवबागमध्ये पर्यटन बंद

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

‘सीआरझेड’खाली कारवाई : मालवणात आज तहसील कार्यालयावर मोर्चा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या देवबाग, तारकर्ली, वायरी या गावातील बांधकामांवर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात या तीनही गावातील पर्यटन व्यावसायिकांनी दि. ६ व ७ जानेवारी रोजी आपले पर्यटन व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे. या बंदला बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हे पर्यटन व्यावसायिक आपली भूमिका शासन दरबारी मांडणार आहेत. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी या गावातील बांधकामावर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात पर्यटन व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला होता. दरम्यान, तारकर्ली येथील टीटीडीएस या पर्यटन संस्थेने या आंदोलनात आपण सहभागी नसलो तरी आपली कोणतीही विरोधी भूमिका नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बुधवारी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. मात्र, हॉटेलमध्ये आलेले काही पर्यटक बोटिंगचा आनंद घेत असल्याने हा बंद संमिश्र असल्याची स्थितीही दिसत होती. मात्र, तीनही गावच्या समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष बाबू बिरमोळे यांनी बुधवारचा बंद ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)बाबा मोंडकर : कागदपत्रांची पूर्तता...तारकर्ली पर्यटन व्यवसायिक संस्था या बंद आंदोलनात सहभागी झाली नाही. शासनाकडून स्थानिकांचे व्यवसाय, बांधकामे नियमित करण्यासाठी सहकार्य मिळत आहे. व्यावसायिकांनी आवश्यक ती कागदपत्रे व अन्य परवाना पूर्तता केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आम्हा व्यावसायिकांच्या अन्य काही मागण्या आहेत, त्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी बंद मध्ये सहभागी नसलो तरी व्यवसायिक प्रशासनाकडे निवेदन देतील, असे सांगितले.पर्यटन व्यवसायिकांच्या बंदमध्ये काहींनी सहभाग न दर्शविल्याने या व्यावसायिकांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी या बंदला पाठींबा देत तसेच आपलेही प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बंदमध्ये सहभाग घेतला. उद्या गुरुवारी पर्यटन व्यवसाय १०० टक्के बंद ठेऊन मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन गावात बंद आंदोलनतीन गावातील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला. या बंदमुळे तीन्ही महत्वाच्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय बंद होता.