शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला उभारीसाठी निसटत्या विजयाचे ‘टॉनिक’

By admin | Updated: February 23, 2017 23:49 IST

देवगड, कुडाळ, वैभववाडी, दोडामार्गमधील पिछाडी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी

महेश सरनाईक-- सिंधुदुर्ग  सिंधुुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे यांचे सुरूवातीला शिवसेना आणि त्यानंतर काँग्रेससोबत जोडले गेलेले अतूट नाते जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या विजयाने पुन्हा बहरून आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आलेली मरगळ भरून निघण्यासाठी हे नाते आगामी काळात महत्वाची भूमिका बजावणार आहे. सिंधुदुर्गात नारायण राणेंचीच जादू चालते हे पुन्हा एकदा येथील जनतेने सिद्ध केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विजय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उभारी देणारा ठरला आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेसने २७ जागा जिंकून एकहाती सत्ता काबिज केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून निवडून आलेली दोडामार्गमधील जागा काँग्रेसच्या पाठींब्याने असल्यामुळे सदस्यसंख्या २८ होणार आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे हा विजय राणेंच्या राजकीय कारर्किदीसाठीदेखील महत्वाचा मानला जात आहे. तस पाहता राणेंचा सिंधुदुर्गमधील गड खालसा करण्यासाठी भाजपाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी भाजपाचे राज्यातील स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुडाळ येथे सभादेखील घेतली. मात्र, हे सर्व करूनही काँग्रेसकडून जिल्हा परिषदेतील सत्ता हस्तगत करणे सोडा दोन अंकी आकडा गाठणेही भाजपला शक्य झालेले नाही. उलटपक्षी शिवसेनेने सिंधुदुर्गात चांगले यश मिळविले आहे. शिवसेनेच्या जागा मागील निवडणुकीच्यामानाने चौपटीने वाढ झाली आहे. त्यासाठी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामानाने पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा करिष्मा त्यांच्या (पान कक वर)मालवण-कणकवलीत शतप्रतिशत काँग्रेसकाँग्रेसने कणकवली तालुक्यात सर्वच्या सर्व म्हणजे जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागा जिंकून जिल्ह्यात एक वेगळाच रेकॉर्ड केला आहे. कणकवलीत गत निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती केली आहे.मालवणातील सहा जागांपैकी पाच जागा जिंकून काँग्रेसच वरचड ठरली आहे. याठिकाणी शिवसेनेने अतिशय प्रतिष्ठेची लढाई केली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी एकहाती किल्ला लढवित काँग्रेसला यश मिळवून दिले.