शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय घोटाळा ; चौकशी मंत्रालयातून

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

सावंतांनी दिले पुरावे : दीपक केसरकरांचे आश्वासन

सावंतवाडी : पंचायत समितीत शौचालय वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सदस्य राघोजी सावंत यांनी थेट ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली असून, त्यांनी या प्रकरणाची मंत्रालय पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांना दिले आहे. यामध्ये सद्यस्थितीत १ कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचे मत राघोजी सावंत यांनी व्यक्त केले आहे.पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी वेर्लेसह काही ठिकाणी शौचालय वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून, ज्यांना सरकारी पैशातून घर व शौचालये देण्यात आली, त्यांनाच पुन्हा शौचालयाचे वाटप करण्यात आल्याचे राघोजी सावंत यांचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबत कागदपत्रासह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे तक्रार केली असून, आता तर थेट ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही या प्रकरणी तक्रार केली आहे.सावंत यांच्या मते पूर्ण तालुक्यात शौचालय चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले असून सरकारी योजनांचा फायदा त्याच त्या कुटुंबाना देण्यात आला आहे. पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी ही बाब मुद्दामहून घडवून आणली असून, कागदोपत्री जरी पैसे त्या कुटुंबाना दिले असले, तरी त्यांनी प्रत्यक्षात शौचालये बांधली नाहीत. एका वेर्ले गावातच लाखो रूपयांचा हा भ्रष्टाचार असून, अशी अनेक गावे आहेत. त्यामध्ये सरकारी योजनेच्या नाव, अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वत:चा फायदा केला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूनदिले. (प्रतिनिधी)मंत्र्यांकडे कागदपत्रे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शौचालय घोटाळ प्रकरणाची मंत्रालय पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन राघोजी सावंत यांना दिले असून सावंत यांनी आपल्याकडील कागदपत्रेही ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत.