शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आजचे शिक्षक उपक्रमशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 00:10 IST

चंद्रकांत अणावकर : कणकवलीत विद्यार्थी दत्तक सोहळ्याचे आयोजन

कणकवली : शासन तसेच प्रशासनाच्या चुकांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा त्रास प्राथमिक शिक्षकांना सहन करावा लागत आहे. तरीही प्राथमिक शिक्षक विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करीत असून यापुढेही विद्यादानाचे पवित्र कार्य त्यांनी असेच सुरू ठेवावे. संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी केले.येथील कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेच्यावतीने रविवारी रक्तदान शिबिर तसेच विद्यार्थी दत्तक सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य सहसचिव किसन दुखंडे, राज्य महिला प्रतिनिधी सुरेखा कदम, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, श्रीकृष्ण नानचे, नामदेव जांभवडेकर, नाना देसाई, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, संतोष पाताडे, नितीन कदम, दिलीप कदम, तालुका समिती अध्यक्ष गिल्बर्ट फर्नांडिस, सरचिटणीस संतोष कुडाळकर, प्रसाद कांबळी, मंगेश मुद्रस, राजेंद्रप्रसाद मणेरीकर आदी यावेळी उपस्थित होते.अणावकर म्हणाले, प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेबाबत शिक्षणतज्ज्ञ अथवा शिक्षणमहर्षी चर्चा करीत नाहीत. शाळेच्या माध्यमातून सुसंस्कृत व सुशिक्षित मुले बनली पाहिजेत, यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. संघटना त्यांच्या नेहमीच पाठीशी राहील.शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया, असे डॉ. संभाजी शिंदे म्हणाले. सुरेखा कदम, नाना देसाई, गिल्बर्ट फर्नांडिस, राजन कोरगावकर आदी मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)२५ विद्यार्थी दत्तकआर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तसेच आई-वडील नसलेल्या २५ विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च समितीच्यावतीने केला आहे. ३५ दात्यांचे रक्तदानप्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आयोजित केलेल्या शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले.