शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण अर्बन बँकेसाठी आज मतदान

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : १५ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. बांगर यांनी दिली. चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १५ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनेलने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर नवउदय पॅनेलने सहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ५ अपक्षांपैकी एक अपक्ष दोन जागेवर लढत असल्याने तो व अन्य एक अपक्ष मिळून दोघांचे पॅनेल आहे. दोन अपक्ष स्वतंत्र लढत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. पैकी २३ केंदे्र चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल, प्रेमजीभाई आसर, गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल येथे आहेत, तर चिपळूणबाहेर गुहागरमध्ये पाच मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी पाटपन्हाळे हायस्कूल, शृंगारतळी येथे मतदान होणार आहे. देवरुख येथे दोन केंद्रे असून, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कन्या शाळा क्र.४ देवरुख येथे मतदान होणार आहे. दापोली सहायक निबंधक सहकार संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय रत्नागिरी, चिपळूण अर्बन को-आॅप. बँक शाखा पनवेल या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी एक-एक मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि पाच मतदान अधिकारी असतील. अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ४० पोलीस कर्मचारी तैनात ठेवले आहेत. देवरुख व रत्नागिरीसाठी एक, लोटे (खेड) दापोलीसाठी एक व चिपळूणसाठी आठ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वांत जास्त २४ हजार ४७८ मतदार चिपळूणमध्ये आहेत. गुहागरमध्ये ५ हजार ५४८, लोटे येथे १ हजार ४२१, देवरुखमध्ये १ हजार ९६४, दापोली येथे २०७, रत्नागिरी येथे १३९ व पनवेल येथे १२० मतदार आहेत. ३५३ मते संस्था, फर्म व इतर आहेत. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे शनिवारी अर्बन बँकेच्या राजाभाऊ रेडीज सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बांगर यांनी स्पष्ट केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रियांका माने काम पाहत आहेत. सोमवारी (दि. १५) सकाळी नऊ वाजता अर्बन बँकेच्या राजाभाऊ रेडीज सभागृहात मतमोजणी होणार आहे.