शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

नारायण राणेंची उपस्थिती : कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य स्टॉलची उभारणी

कुडाळ : कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सिंधुकृषी औद्योगिक, पशु, पक्षी व मत्स्य व्यवसाय प्रदर्शन मेळावा या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा औपचारिक शुभारंभ मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या संकल्पनेतील भव्य व राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळा या प्रदर्शनाचे कुडाळ नवीन एसटी बसस्थानकाच्या आवारात मैदानावर १७, १८, १९ व २० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १८ मार्च रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन १७ मार्चपासून सुरू झाले असून, प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, युवकचे अध्यक्ष दादा साहिल, काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, रुपेश पावसकर, पावशी सरपंच पप्या तवटे, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले व प्रकाश कुंटे, प्रफुल्ल वालावलकर, अस्मिता बांदेकर, अनिल खुडपकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्यस्तरावरून कृषी, पशुसंवर्धन तसेच मत्स्य विभागासंदर्भातील स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, प्राणी संगोपन व इतर विषयासंदर्भातही स्टॉल उभारण्यात आले आहेत. कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुदृढ बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळी, मेंढी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आकर्षक डॉग शोचेही आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी पर्वणीया स्टॉलमध्ये कृषीविषयक सुमारे दोनशे स्टॉल असून, यामध्ये बियाणे, खते, जंतूनाशके तसेच ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर्स, इरिगेशन व सोलर यासह नामांकीत कंपन्यांचे दालन ठेवण्यात आले आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान विषयक चर्चासत्रेही होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदार व शेतकऱ्यांसाठी हा मेळावा पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान, औपचारिक उद्घाटनानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी संपूर्ण प्रदर्शनातील स्टॉल्सची पाहणी केली.