शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक

By admin | Updated: June 10, 2014 01:36 IST

सावंतवाडीत बिनविरोध: वेंगुर्लेतील लढतीकडे लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नसून उद्या, मंगळवारी वेंगुर्ला व सावंतवाडी या दोन नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम होणार असून मालवण नगरपरिषदेची नगराध्यक्ष निवड ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार आहे. मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने बबन साळगांवकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे, तर वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी प्रसन्ना कुबल व मनीष परब या राष्ट्रवादीच्याच दोन नगरसेवकांनी अर्ज सादर केल्याने राष्ट्रवादीचीच सत्ता असलेल्या या पालिकेवर अध्यक्षपदासाठी पक्षाने प्रसन्ना कुबल यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांना विरोध करणाऱ्यांना व्हीप बजावला आहे. अशा परिस्थितीत नेमके काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसह नगराध्यक्षांना विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता याबाबतच्या कोणत्याही सूचना वा लेखी आदेश आपल्याकडे प्राप्त झाले नसून, या चर्चेसंदर्भात नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधला असता अशाप्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या सावंतवाडी व वेंगुर्ला या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष निवडी होणार आहेत, तर २०जूनला मालवण नगराध्यक्ष निवड होणार आहे. (प्रतिनिधी)