शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यावेळी’ संसदेत सुवर्णकाळ होता

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

सुनीलकुमार लवटे : सावंतवाडीत बॅ. नाथ पै स्मृतिदिन कार्यक्रम

सावंतवाडी : बॅ. नाथ पै यांच्या काळात विरोधी पक्षनेता व सत्ताधारी नेता या दोघांमध्ये वैर नसून मतभेद होते. यामुळे एकमतांनी ठराव मंजूर व्हायचे. असा सुवर्णकाळ संसदेत पहायला मिळायचा. त्या काळाचे शिल्पकार बॅ. नाथ पै होते, असे प्रतिपादन साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी केले. बॅ. नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. जी. ए. बुवा, प्राध्यापक डॉ. एल. हिंगमिरे, सचिव रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते. यानंतर साहित्यिक सुनीलकुमार लवटे म्हणाले, बॅ. नाथ पै यांच्या स्वप्नामध्ये कोकणचा विकास होता. ते स्वप्न त्यांनी सत्य केले व कोकणचा कॅलिफोर्निया केला. बॅ. नाथ पै कोकणला लाभले, हे कोकणचे सौभाग्य आहे. सन १९५०-६० सालचा कोकण आज त्यांच्या नेतृत्वामुळे समृद्ध कोकण झाला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात जे दारिद्र्य होते, ते दूरही झाले आहे. त्याकाळात नेतेमंडळी शाळेला भेट देतेवेळी भाताची पेज वगैरे घेऊन जात होते. आता मात्र तो काळ बदलला आहे, असेही लवटे म्हणाले. कोकण हा जागतिक पातळीवर पोहोचावा, यासाठी त्यांनी कोकणातून रेल्वे आणण्यासाठीच प्रयत्न केले. कोकण हा भाग रेल्वेला जोडला पाहिजे, असेही त्यांचे स्वप्न होते. बॅ. पै यांनी संसदेचा एकही दिवस वाया घालविला नाही. नवे लोकप्रतिनिधित्व घडविण्याची त्यांची ताकद होती. यानंतर त्यांची जागा मधु दंडवते यांनी घेतली. दिल्लीची रेल्वे कोकणाला जोडली व आता ती केरळपर्यंत पोहोचली आहे, असे लवटे यांनी सांगितले. बॅ. नाथ पै हे जागतिक स्तरावर नेतृत्व करणारे होते. ते नाथ पै म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश पोरखा झाला आहे. संसदेत बॅ. नाथ पै बोलायचे, तेव्हा पं. जवाहरलाल नेहरूही त्यांचे भाषण ऐकायचे, असे रमेश बोंद्रे म्हणाले. यावेळी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)स्वप्न अधुरे..!शेतकऱ्यांची वकिली १९६७ मध्ये बॅ. नाथ पै यांनी केली. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकमधील कालव्यांचे पाणी शेतामध्ये आणायचे, हे त्यांचे अधुरे स्वप्न होते. कालवे शेतांना जोडल्यास खरोखरच विकास होईल व तेव्हाच बॅ. नाथ पै यांचे स्वप्न पूर्ण होईल व कोकणचा खऱ्या अर्थाने कॅलिफोर्निया होईल, असे यावेळी साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले.