शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य हंगामातच सुरू झाली संघर्षाची लाट, पर्ससीनधारकांकडून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 10:52 IST

आम्हाला पर्ससीन नेट लावायचा आहे, तुमची जाळी ओढून घ्या. नाहीतर जाळी तोडून टाकू अशी धमकीपूर्ण भाषा समुद्रात देण्यात आल्याने मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सुचनेनुसार  या गंभीर प्रकाराची माहिती मच्छिमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिली आहे.

ठळक मुद्दे मत्स्य हंगामातच सुरू झाली संघर्षाची लाट, पर्ससीनधारकांकडून धमकी मच्छिमारांनी मत्स्य विभागाचे वेधले लक्ष

मालवण : मत्स्य हंगामाची सुरुवात संघर्षाने होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांना मासेमारी करताना पर्ससीनधारकांकडून अर्वाच्य भाषेत धमकी देण्याचे प्रकार वाढले आहे.

आम्हाला पर्ससीन नेट लावायचा आहे, तुमची जाळी ओढून घ्या. नाहीतर जाळी तोडून टाकू अशी धमकीपूर्ण भाषा समुद्रात देण्यात आल्याने मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सुचनेनुसार  या गंभीर प्रकाराची माहिती मच्छिमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिली आहे.बेकायदेशीरपणे कुणी पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करीत असेल तर त्यासंबंधीची माहिती मच्छिमारांनी मत्स्य विभागाला द्यावी, अशी सूचना मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी २६ जून रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार गुरुवारी पारंपरिक मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात जाऊन सिंधुदुर्गच्या समुद्र्रकिनाऱ्यावर अवैधरित्या सुरू असलेल्या पर्ससीन मासेमारीची माहिती दिली.

त्यामुळे नवा मत्स्य हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. परप्रांतीय नौकांना रोखण्याचे मोठे आव्हान मत्स्य विभागासमोर असणार आहे.पारंपारिक मच्छिमारांच्यावतीने माहिती देताना महेंद्र पराडकर म्हणाले, बेकायदेशीर पर्ससीन आणि एलईडी मासेमारीची माहिती पारंपरिक मच्छिमारांनी दिली तर मत्स्य विभागास कारवाई करणे सोपे जाईल असे २६ जून रोजी मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुनराव म्हणाले होते.

त्यानुसार आज बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांना दिली. राज्याच्या सागरी हद्दीत ३१ आॅगस्टपर्यंत पर्ससीन मासेमारीवर बंदी लागू आहे. असे असतानाही अवैधरित्या पर्ससीन मासेमारी केली जात आहे.पोलीस अधीक्षकांची भेट घेणारबेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीमुळे निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात पारंपरिक मच्छिमारांनी आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शुक्रवार २३ आॅगस्ट रोजी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी पारंपरिक मच्छिमार आमदारांसमवेत पोलीस अधीक्षकांच्या भेटीस जाणार असल्याचे पराडकर यांनी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग