शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत जागेसाठी तुंबळ हाणामारी

By admin | Updated: September 22, 2015 23:53 IST

खेड रेल्वेस्थानकातील प्रकार : प्रवासी महिलेचा पाय मोडला; नातेवाईक संतप्त

खेड : खेड रेल्वे स्थानकात मंगळवारी सायंकाळी आलेल्या मांडवी एक्स्प्रेसमध्ये अक्षरश: राडा झाला. रेल्वेतील प्रवासी आणि स्थानकातील प्रवाशांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. मुलगा रेल्वेत चढला; परंतु आई-वडिलांना गाडीत चढू न दिल्याने प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली.या गडबडीत मुलाच्या आईचा पाय मोडल्याने तिला खेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. स्थानकात मोजक्याच असलेल्या पोलिसांची या प्रकारामुळे चांगलीच भंबेरी उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून जादा कुमक मागविल्याने मोठा अनर्थ टळला.खेड तालुक्यातील एक कुटुंब खेड रेल्वेस्थानकात मुंबईला जाण्यासाठी मांडवीच्या प्रतीक्षेत होते. रोज ४.२0 वाजता येणारी मांडवी एक्स्प्रेस मंगळवारी सायंकाळी तब्बल ५.२0 वाजता आली. यावेळी स्थानकामध्ये मोठी गर्दी उसळली होती. ही गाडी आधीपासूनच प्रवाशांनी खचाखच भरून आली होती. अशातच खेड स्थानकात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रवासी गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्याने स्थानकातील प्रवाशांनी दरवाजावर हाताने मारण्यास सुरुवात केली. स्थानकात मोजकेच पोलीस असल्याने ते काहीही करू शकत नव्हते. अखेर एक दरवाजा उघडला गेला. याचा फायदा घेत एक मुलगा या दरवाजातून आत शिरला. पाठोपाठ त्याची आई चढत असतानाच तिला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या महिलेच्या नातेवाइकांची आतील प्रवाशांबरोबर (पान १ वरून) जोरदार जुंपली. मुलगा आत चढल्याबरोबर दरवाजा आतून बंद केला. मात्र, मुलाचे सर्व नातेवाईक बाहेर होते. आमच्या मुलाला तरी बाहेर पाठवा अन्यथा आम्हाला आत घ्या, असा आक्रोश यावेळी नातेवाइकांनी केला. मात्र, आतील प्रवासी ऐकायला तयार नव्हते. अखेर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असताना गर्दीत मुलाच्या आईचा पाय मोडला. यावेळी मात्र स्थानकातील इतर प्रवाशांनीही आक्रमकता दाखविली. यावेळी आतील प्रवाशांना मारहाण केली. हाणामारीनंतर रेल्वे ताबडतोब सुटल्याने पोलिसांनाही कारवाई करता आली नाही. मुलाच्या आईला घेऊन त्यांचे नातेवाईक खेड येथील खासगी दवाखान्यात गेले. बुधवारी कामावर जाण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर खेडमध्येच राहण्याची वेळ आली. राज्य राखीव पोलीस दलास पाचारणपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानकावरील पोलिसांनी जादा कुमक मागविली. तसेच राज्य राखीव पोलीस दल आणि काही लष्करी जवानही तातडीने रेल्वेस्थानकात तैनात करण्यात आले.मांडवी एक्स्प्रेसमध्ये जागा न मिळाल्याने मुंबईला जाणारे अनेक प्रवासी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येणाऱ्या वेरावळ गाडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, ही गाडीही भरून आल्याने प्रवाशांना गाडीत चढताना नाकीनऊ आले होते.