शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

महावितरण : उद्दीष्टापेक्षा अधिक जोडण्या देत कामावर छाप, शेतकऱ्यात समाधान

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून गेल्या सहा वर्षात कृषीपंपाच्या ३३८० वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. २००८मध्ये ११८३८ इतक्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या होत्या. २०१५मध्ये १५२१८ इतक्या जोडण्या झाल्या आहेत. २०१०पासून महावितरण कंपनीने दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक जोडण्या दिल्या आहेत.कोकणात भात लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात येते. भाताबरोबर नागली तसेच कडधान्य, तृणधान्य व भाजीपाला लागवड करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तसेच ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एकूणच भातशेतीबरोबर बागायतीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. आंबा, काजूबरोबर कलिंगड, केळी, पपई यांसारखी शेतीही करण्यात येत आहे. कोकण भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंप बसवण्यात येतात. कृषी विभागाकडून पंप अनुदानावर देण्यात येत असून, महावितरणकडून जोडण्या देण्यात येतात. गेल्या सहा वर्षात कृषीपंप जोडण्यांमध्ये ३३८० इतकी वाढ झाली असली तरी ५०० पेक्षा अधिक वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कातळभागातही माती विकत आणून बागायती फुलवण्यात आली आहे. कातळावर हजारो रुपये खर्चून विहिरी पाडण्यात आल्या आहेत. परंतु अशा ठिकाणी अद्याप कृषी पंपाच्या जोडण्या देण्यास महावितरण असमर्थ ठरले आहे. कातळ भागातील वीजजोडण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याची समस्या महावितरणपुढे उभी ठाकली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून कृषी पंप देऊनसुध्दा त्याला जोडण्या मिळत नसल्यामुळे पंप गंजत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. ठेकेदाराची समस्या महावितरण मांडत असले तरी त्यावर पर्याय काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ५००पेक्षा अधिक जोडण्या प्रलंबित असल्या तरी दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट महावितरणने पार केले आहे. जिल्ह्याच्या कृषीपंपाची आकडेवारी पाहता रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कृषी पंप आहेत. त्यापाठोपाठ दापोली व गुहागर तालुक्यात पंप आहेत. कृषी पंपाच्या आकडेवारीत रत्नागिरी मागोमाग दापोली व गुहागरची आघाडी आहे. या साऱ्यामध्ये महावितरणची भूमिका महत्वाची ठरली आहे. (प्रतिनिधी)गेल्या सहा वर्षात महावितरणने तालुकानिहाय दिलेल्या जोडण्यातालुका२००८ पर्यंत जोडण्या२००९२०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५एकूणचिपळूण९०७६१४९४०७०७२८५७५१३५७गुहागर१७५५६९४४६२८९४७१२१६७२२५०खेड३१६९९२१२७२१३३२३४५९दापोली१६९७५३६१६१९५१२११३२५९२२७९मंडणगड५८१३८१३१४३४२१२१३५७५७रत्नागिरी३४३९१००८५८५१८३१२६१७०१४६४१७८संगमेश्वर८१७२३३२३२३९४२४६४४१०२४राजापूर१४२५११५७५७७०७३९५७११७७०लांजा९०११६४३४२२१२२२०९१११४४एकूण११८३८३८०३९३४१४६२८५४५७२३६११५२१८