शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खूनप्रकरणी तीन संशयितांना अटक

By admin | Updated: April 18, 2015 00:02 IST

प्रेमप्रकरणातून खून झाल्याच्या संशयाला पुष्टी

रत्नागिरी : शहरातील हिंदू कॉलनीत भरदुपारी झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रूपेश चंद्रकांत बिर्जे (वय २२, कुरतडे, पालवकरवाडी), अजित यशवंत तळेकर (२२, कुरतडे) सिद्धेश प्रमोद घाग (२४, शांतीनगर, नाचणे) या तिघांना अटक केली. न्यायालयाने शुक्रवारी त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खून झाल्यानंतर दहा तासांतच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या खून प्रकरणात हल्लेखोरांनी वापरलेली नॅनो कार पोलिसांनी जप्त केली असून, अजून तीन ते चार अनोळखी आरोपी व दोन दुचाकी यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता शहर पोलिसांकडून उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रेम त्रिकोणातून हे प्रकरण घडल्याचे पुढे आले आहे. मृत विनायक घाडी याचे व एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्या तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. विनायक याच्यावर आपले प्रेम होत,े तर रूपेश बिर्जे याला आपण मित्र मानत होते, असे संबंधित तरुणीने जबाबात म्हटले आहे. त्यामुळे रूपेश बिर्जे तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता, असे तपासात पुढे आले आहे. विनायकवर त्या तरुणीचे प्रेम असल्याचा राग मनात धरूनच विनायकचा काटा काढल्याचा संशय आहे. मोबाईल उकलणार  खुनाचे गूढया प्रकरणातील संबंधित तरुणीचा मोबाईल हॅँडसेट, मृत विनायक घाडीचे दोन मोबाईल हॅँडसेट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेतील आरोपी रूपेश बिर्जे, सिद्धेश घाग व नितीन तळेकर यांचेही मोबाईल हॅँडसेट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे फोन कंपन्यांकडून या सीमवरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणात नेमके काय घडले, हे स्पष्ट होणार आहे. वार करणाऱ्याचा शोध सुरूप्रथम अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आलेल्या तरुणांची विनायकशी झटापट झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या तरुणाने हत्याराचे वार केल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे त्या आरोपीचा पोलीस शोध घेत असून, त्याला लवकरच अटक होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.