शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटात सुमो उलटून तीनजण जखमी

By admin | Updated: May 31, 2014 01:12 IST

सुमो सांगलीची : साखरपुड्यासाठी चालले होते गोव्याला

सावंतवाडी : सांगलीहून गोवा-मडगाव येथे साखरपुड्यासाठी जाणार्‍या सुमोला आंबोली-कुंभेश्वरनजीक अपघात झाला. या अपघातात नियोजित वरासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात चार वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरीत्या बचावला. अपघातानंतर जखमींना तत्काळ एस.टी. बसने सावंतवाडीत आणण्यात आले. याबाबत माहिती अशी की, सांगली येथील वाकोडे कुटुंबीय आज, शुक्रवारी गोवा-मडगावकडे चार वाहनांतून साखरपुड्यासाठी चालले होते. दुपारी ही सर्व वाहने भरधाव वेगाने जात होती. त्यातीलच सुमोमध्ये नियोजित वरासह अन्य सात ते आठजण होते. भरधाव वेगाने चाललेली सुमो आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कुंभेश्वर येथील एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाडावर आदळून उलटली. अचानक घडलेल्या या अपघातात नियोजित वरासह सर्व प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने एस.टी. बसने सावंतवाडी कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. यातील तिघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात नियोजित वर प्रसाद वाकोडे (वय २२), चालक महेश बाळासाहेब कोळी (२२), किरण लक्ष्मण भिसे (२४) या तिघांना गंभीर दुखापत झाली असून, अश्विनी वाकोडे (१९) हिला किरकोळ दुखापत झाली. प्रसादचे वृद्ध आई-वडीलही या अपघातातून बचावले आहेत. (प्रतिनिधी)