शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

उर्दूची प्रश्नपत्रिका तीन हस्ताक्षरात

By admin | Updated: December 14, 2014 23:48 IST

टीईटी परीक्षा : वेगवेगळ्या अक्षरांमुळे परीक्षार्थीही गोंधळले...

रत्नागिरी : शासनाकडून आज रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता फेरीच्या मराठी व इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका प्रिंटिंग केलेल्या, तर उर्दू शिक्षकांसाठीच्या प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात लिहिलेल्या असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे हस्ताक्षरही एका व्यक्तीचे नसून तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे होते.टीईटी परीक्षा नको, असा सूर भविष्यात शिक्षक म्हणून कार्यरत होणाऱ्या डी. एड.धारकांकडून फार पूर्वीपासून उमटत आहे. हजारो रुपये खर्च करुन दोन वर्षे मेहनत करुन डी. एड. पदवी मिळवण्यात येते. मात्र, त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत असल्याने डी. एड.धारकांमधून नाराजी पसरलेली आहे. गतवर्षी शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अगदी कमी लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रात चलबिचल निर्माण झाली होती. आज रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी जिल्हाभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यासाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशी तीन प्रकारच्या प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या.मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छपाई करण्यात आल्या होत्या. मात्र, उर्दूची प्रश्नपत्रिका छपाई न करता ती हस्ताक्षरात लिहून त्याच्या प्रती परीक्षार्थींना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अगोदरच या परीक्षेपासून नाराज असलेल्या डी. एड.धारकांच्या नाराजीमध्ये आणखीच सूर मिसळला. या परीक्षेसाठी काढण्यात आलेली उर्दूची प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात लिहिलेली असली तरी ती एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरात असणे आवश्यक होते. मात्र, त्या प्रश्नपत्रिकेतील हस्ताक्षर एका व्यक्तीचे नसून वेगवेगळ्याा तीन व्यक्तींचे असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. अशा प्रकारची वेगवेगळ्या हस्ताक्षरातील प्रश्नपत्रिका काढण्यात आल्याने परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतर माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छपाई केलेल्या, तर उर्दू माध्यमाची प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात का, असा प्रश्न उर्दूच्या परीक्षार्थींकडून व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)