शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सज्जनराव रावराणे यांना धमकी

By admin | Updated: October 18, 2015 00:20 IST

वैभववाडीची घटना : अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार, बाजारपेठ बंद

वैभववाडी : येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांना अनोळखी व्यक्तींनी शुक्रवारी धमकी दिली. त्यामुळे काँग्रेसेतर सर्वपक्षीय शनिवारी सकाळी एकवटले. सर्वपक्षीयांनी व्यापाऱ्यांना आवाहन करीत काहीकाळ बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला. काँग्रेसेतर सर्वपक्षीयांसह व्यापाऱ्यांनीही सज्जनरावांना पाठिंबा म्हणून पोलीस ठाणे गाठले. या सर्वांनी प्रचारासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींना शहराबाहेर काढण्याची मागणी केली. मतदार यादीत नाव नसलेली व्यक्ती शहरात ठेवणार नाही, असे आश्वासन पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिले. दरम्यान, सज्जनराव यांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली. ४५ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले सज्जनराव यांच्या पत्नीला प्रभाग क्र. १२ मधून काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे सज्जनरावांची पत्नी सरिता भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी रावराणे यांना धमकावले. याबाबत त्यांनी काँग्रेसेतर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे काँग्रेसेतर सर्वपक्षीय कार्यकर्ते देवीच्या मंडपात जमले. त्यांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सज्जनरावांना धमकावल्याचे सांगून निषेध म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. ते व्यापारी, पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानंतर बाजारपेठत फिरून व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद केली. सर्वजण पोलीस ठाण्याकडे गेले. पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक राजेंद्र्र गुरव यांनी या जमावाशी चर्चा केली. त्यावेळी अनोळखी वाहने घेऊन आलेले लोक शहरात राहत असून, शहरातील लोकांना धमकावून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना शहराच्या बाहेर काढा, अशी मागणी सर्वपक्षीय आणि व्यापारी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली. या काळात शहरात तणाव सदृश वातावरण होते. पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी मतदार यादीत नाव नसलेल्या अनोळखी व्यक्तींना शहरात ठेवणार नाही, असे स्पष्ट केले. आणि जर कोणी तसे आढळले, तर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन बर्वे यांनी केले. तसेच अनोळखी व्यक्तींचा मुक्काम असलेली ठिकाणे आणि त्यांच्याकडील वाहनांची माहिती पोलिसांनी घेतली. यावेळी सज्जनराव रावराणे, दिगंबर सावंत, मनोज सावंत, जयेंद्र्र रावराणे, प्रमोद रावराणे, अशोक रावराणे, गुलाबराव चव्हाण, विजय रावराणे, मंगेश लोके, टी. एस. घोणे, रत्नाकर कदम, भानुदास तावडे, रणजित तावडे, दिलीप रावराणे, मारुती मोहिते, गणेश मसूरकर, शंकर स्वामी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सज्जनरावांची तक्रार शुक्रवारी सकाळी १0.३0 च्या सुमारास घराजवळ असताना आमदार नीतेश राणे सांगुळवाडीकडून वैभववाडी बाजारपेठत येताना दिसले. तेव्हा आपण त्यांना हात दाखविला. आमदार राणे थांबले. त्यांच्याशी चर्चाही झाली. ते निघून गेले. मात्र, त्यांच्या पाठोपाठ असणाऱ्या वाहनात तीन अनोळखी लोक होते. माझ्याकडे पाहून त्यांनी याला बघून घ्या रे, असे धमकावले आणि निघून गेले. त्यामुळे त्यांच्यापासून धोका असल्याची तक्रार सज्जनराव यांनी पोलिसांत दिली आहे.