शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नव्या नगरपंचायती हजारो कुळांच्या मुळावर

By admin | Updated: September 18, 2015 23:15 IST

आणखी एक अन्याय : नव्या बदलांमुळे कुळांच्या हक्कावर गदा

शोभना कांबळे-रत्नागिरी  -शासनाने बेदखल कुळांच्या अनेक वर्षांच्या समस्या संपवण्याच्या दृष्टीने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत सुधारणा अधिनियम लागू करून त्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबित करता येतो. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यात सुमारे तीन लाख कुळवहिवाटदार आहेत. या बेदखल कुळांना तसेच कुळवहिवाटदारांना आपला हक्क शाबीत करण्यात यावा, त्यांना या जमिनीच्या विक्रीबाबत अधिकार मिळावेत, यासाठी शासनाने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करून तशी तरतूद केली आहे. शासनाच्या या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबीत करता येतो. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या लांजा, देवरूख, गुहागर आणि आता होऊ घातलेल्या मंडणगड या नगरपंचायतींच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता आपल्या मालकी हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गुहागरमधील असगोली, लांजा शहर, गुहागर शहर, देवरूख शहर तसेच नव्याने नगरपंचायत होऊ घातलेले मंडणगड शहर हे पूर्वी ग्रामीण भागात येत असल्याने येथील कुळांनी वहिवाट शाबीत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, या चारही शहरात नगरपंचायत झाल्याने आता ही शहरे ग्रामीण क्षेत्रात न येता नगरपंचायतीच्या शहर क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत. साहजिकच या चारही शहरातील कूळवहिवाटदारांच्या मालकीची जमीनही आता नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्याने नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार त्यावर कुळांना हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता ही कुळे अडचणीत आली आहेत.गुहागरमधील असगोली हे गाव आता गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. याबाबत असगोलीतील कुळांनी कोकण आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकणदौऱ्यावर आलेल्या समितीसमोर आपली ही व्यथा मांडली होती. ही नवीन समस्या निर्माण झाल्याने मोपेलवार यांनी ही समस्या शासनासमोर मांडून लवकरच तिची सोडवणूक करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, याबाबत कोणताच निर्णय अद्याप झालेला नसल्याने या कुळांच्या हक्कांबाबतचा निर्णय अजूनही अधांतरीच आहे. (प्रतिनिधी)कुळांच्या हक्काचा निर्णय अधांतरीरत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये कुळांना ते वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी परत मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. कुळांची वहिवाट असली तरी त्यांना त्या जमीन विकताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना करता येणार आहे. त्यासाठी नजराणा भरणे गरजेचे आहे.या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच हक्क मिळाला आहे. मात्र, नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या लांजा, गुहागर, देवरूख या तीन आणि अधिसूचना जारी झालेल्या मंडणगड या नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांच्या हक्काबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गुहागर नगरपंचायतीच्या कक्षेत असगोली हे गाव येत असल्याने या कायद्याने येथील कुळांसमोर ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या कुळांनी कुळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आॅगस्ट महिन्यात कोकण दौऱ्यावर आलेले आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांच्यासमोर ही समस्या मांडली होती. ही नवीन समस्या निर्माण झाल्याने मोपेलवार यांनी शासनासमोर ही समस्या मांडून तिची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, याबाबत शासन निर्णय काय होईल, ही चिंता या कुळांना सतावत आहे.