शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘जेलभरो’साठी हजारो मच्छिमार रस्त्यावर

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

कलम ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल

मालवण : निवती समुद्रातील संघर्षानंतर पारंपरिक मच्छिमारांवर कलम ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी ‘जेलभरो’ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात हजारो पारंपरिक मच्छिमार सहभागी झाले. तत्पूर्वी दांडी ते पोलीस ठाणे अशा काढलेल्या महामोर्चात ‘मच्छिमार एकजुटीचा विजय असो’, पर्ससीन रोखा - मच्छिमार जगवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.पारंपरिक मच्छिमारांनी केवळ १३ जणांना नको, आम्हा सर्वांनाच अटक करा, असा पवित्रा घेतला. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, तहसीलदार वनिता पाटील यांनी मच्छिमारांना सामोरे जात त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. जिल्ह्यातील विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मोहीम हाती घेऊ, कलम ३०७ संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर पारंपरिक मच्छिमारांनी आंदोलन स्थगित केले. दरम्यान, आश्वासने न पाळल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या पायरीवर पारंपरिक मच्छिमार बेमुदत उपोषणाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी मच्छिमार नेत्यांनी दिला....तर विधानसभेसमोर उपोषणप्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल झाल्याबाबतही तोडगा काढण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले, तरीही शासनाने आपला शब्द न पाळल्यास आगामी नागपूर अधिवेशनात विधानसभेच्या पायऱ्यांवर पारंपरिक मच्छिमार उपोषणाला बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आज, बुधवारी पारंपरिक मच्छिमारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सकाळच्या सत्रात मासळी मार्केट, बाजारपेठ, स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग बंद ठेवण्यात आले होते. मच्छिमार प्रतिनिधींशी बैठकतहसीलदार वनिता पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी पोलीस ठाण्यात सहायक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण, परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह मच्छिमार प्रतिनिधींशी तातडीची बैठक घेतली. खरात यांनी अनधिकृत मिनी पर्ससीननेटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मत्स्य विभागाने परवाने नसलेल्या व अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा. त्यांच्या बोटी जप्त कराव्यात, अशा सूचना केल्या. यासाठी लागणारा पोलीस फाटा पुरविण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. अनधिकृत मासेमारीवर कारवाईसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात यावा, असे तहसीलदार वनिता पाटील यांनी सांगितले.