शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्ते बदलले तरी समस्या ‘जैसे थे’

By admin | Updated: June 25, 2015 00:58 IST

राज ठाकरेंचा टोला : मच्छिमारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

देवगड : राज्य शासनाची इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने विकासकामे करू शकत नाहीत. त्यांच्या या नाकर्तेपणामुळे राज्यकर्ते बदलले तरी जनतेच्या मागण्या व जनतेच्या समस्या अजूनही तडीस गेल्या नाहीत. कोकण किनारपट्टीवर परराज्यांतील पर्सनेट मच्छिमार घुसखोरी करून मच्छिमारी करीत आहेत. माझ्या पक्षाकडे एकहाती सत्ता द्या, परराज्यांतील मच्छिमारांची कोकण किनारपट्टीवर येण्याची हिंमतच होणार नाही, अशी ठाम ग्वाही मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांनी देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे कामगार सेना सरचिटणीस शरद सावंत, मनसे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, कोकण संघटक परशुराम उपरकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष चेतन कदम, ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यावेळी उपस्थित होते. जिल्हा दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी कुणकेश्वर मंदिराला भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी मनविसेच्यावतीने त्यांचे कॉलेज प्रवेशद्वार येथे स्वागत करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ देवगडच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिक्षण प्रसारक मंडळ देवगडचे कार्यवाह प्रसाद पारकर यांनी या महाविद्यालयाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली, सहकार्यवाह प्रमोद नलावडे, संचालक चंद्रकांत पाळेकर, अमोल जामसंडेकर, आदी उपस्थित होते. देवगड तालुक्यात एकमेव वरिष्ठ महाविद्यालय असून, या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातून प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्येची अट असल्याने काही विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश मिळत नाही. यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी अमोल जामसंडेकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. देवगड तालुक्यातील मच्छिमार संघटनेचे नेते भाई खोबरेकर, चंद्रकांत पाळेकर, जगन्नाथ कोयंडे, द्विजकांत कोयंडे, ज्ञानेश्वर खवळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. आंबा बागायतदारांच्यावतीने सुधीर जोशी यांनी आंब्याला हमीभाव मिळावा, आंबा विक्री केंद्र सुरू करण्यात यावे, आंबा पीक कर्जावरील व्याज माफ करावे या प्रमुख मागण्या राज ठाकरे यांच्याकडे केल्या. पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, माझा संपूर्ण कोकण दौरा हा पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून असून, जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याकडे भर देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटनेला भरारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी हितगूज करून त्यांना मार्गदर्शन करून पक्ष संघटना वाढीसाठी माझे प्रयत्न असणार आहेत. (प्रतिनिधी) राज ठाकरे-नारायण राणे भेट कणकवलीतील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे यांनी ओम गणेश बंगल्यावर दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. तेथे उभयतात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. यावेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. चहापान झाल्यानंतर राज ठाकरे हे बंगल्यावरून निघाले.