शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

गुन्हे दाखल झाले तरी पर्ससीनविरोधात लढणार

By admin | Updated: November 28, 2014 00:08 IST

दांडी चौकचार मंदिरातील बैठकीत पारंपरिक मच्छिमारांचा इशारा

मालवण : येथील पारंपरिक मच्छिमारांनी अनधिकृत पर्ससीन मासेमारीविरोधात लढा उभारलेला आहे. हा लढा तीव्र आहे. पारंपरिक मच्छिमारांच्या भविष्याचा आणि हिताचा विचार करता आम्हाला आप्तस्वकियांशी लढण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. पर्ससीनविरोधात लढताना आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही याची आम्ही तयारी ठेवली आहे. यापुढे अतिक्रमण करून पारंपरिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेल्यास कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही, असा इशारा पकडण्यात आलेल्या मिनी पर्ससीननेटच्या मालकांना देण्यात आला.बुधवारी सायंकाळी देवबाग समुद्रकिनारी अवघ्या पाच वाव अंतरात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन मिनी पर्ससीननेट नौकांना स्थानिक मच्छिमारांनी पकडून किनाऱ्यावर आणले होते. पकडण्यात आलेल्या दोन्ही मिनी पर्ससीननेटधारक नौकांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरूवारी दांडी चौकचार मंदिर येथे ग्रामस्थ मच्छिमारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित मिनी पर्ससीन नौका मालकांना बोलावून इशारावजा समज देण्यात आली.यावेळी बैठकीचे अध्यक्ष छोटू सावजी, नॅशनल फीश वर्कर फोरमचे रविकिरण तोरसकर, जिल्हा श्रमजीवी मच्छिमार संघटनेचे सचिव दिलीप घारे, रूपेश प्रभू, नारायण धुरी, सन्मेश प्रभू, लिलाधर पराडकर, अन्वय प्रभू, बाबू जोशी, कल्पेश रोगे, मिथून मालंडकर, भाऊ मोर्जे, आबा वाघ, रश्मिन रोगे यांच्यासह अन्य उपस्थित होते.आम्ही लढत असलेला लढा स्वत:च्या फायद्यासाठी नसून संपूर्ण किनारपट्टीवरील लहान मच्छिमारांच्या हितासाठी आहे. यामुळे या लढ्यात आमच्याविरोधात कोण आहे? याचा आम्ही विचार करणार नाही. महाभारतातल्या अर्जुनासारखी आमची स्थिती असली तरीही आम्ही हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे घारे म्हणाले.विकी तोरसकर म्हणाले, पर्ससीन बंदीला स्थगिती मिळावी व नव्याने परवाने मिळावेत, यासाठी काही पर्ससीन मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लढा प्रभावीपणे उभारण्यासाठी निधी संकलनाबरोबर राजकीय दबाव निर्माण करण्याची गरज आहे. यावेळी आपल्याकडून चूक झाल्याचे पर्ससीन नौका मालक केळुसकर यांनी कबूल केले. यापुढे पुन्हा अतिक्रमण झाले तर माझ्यावर अवश्य दंडात्मक कारवाई करा, असे ते म्हणाले. बैठकीदरम्यान मच्छिमारांच्या भावना तीव्र होत्या. आम्हीसुद्धा पर्ससीन घेऊ शकतो. मात्र उद्या मत्स्य साठे संपल्यावर दुसऱ्यांच्या घरी पाणी भरण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही लढत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. (प्रतिनिधी)अर्जुनासारखी स्थिती दिलीप घारे म्हणाले, अनधिकृत मासेमारीविरोधात न्यायालयात याचिका सुरू आहे. स्थानिक पातळीवर मिनी पर्ससीनविरोधात वेगळ््या पद्धतीने लढा सुरू ठेवला आहे. पारंपरिक मच्छिमारांच्या हितासाठी आम्ही लढत असताना शासकीय पातळीवर अद्याप यश आले नाही. असे असतानाही किनाऱ्यालगत येऊन काही पर्ससीन नौका अतिक्रमण करीत आहेत. यामध्ये काही आमचेच आप्तस्वकीय आहेत.