शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘त्या’ नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार?

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

राजकीय समीकरणे बदलणार?

रत्नागिरी : रत्नागिरी पालिका उपनगराध्यक्षपदाच्या ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट केल्याचे सांगणाऱ्या चार नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन करून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यांचे हे वर्तन बेकायदा असून, या चारही सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका राष्ट्रवादीचे नगरपालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी आज (शुक्रवार) जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. ही याचिका उपजिल्हाधिकारी नितीन राऊत (पुनर्वसन) यांनी स्वीकारली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठविली आहे. त्यामुळे या चारही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यामध्ये दत्तात्रय विजय साळवी, प्रीती रवींद्र सुर्वे, स्मितल सुरेश पावसकर व मुनीज तन्वीर जमादार यांचा समावेश आहे. रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष असलेले राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सेनेतर्फे संजू साळवी, तर भाजपातर्फे प्रज्ञा भिडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यासाठी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी निवडणूक झाली. त्याआधी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या आदेशानुसार रत्नागिरी पालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना ६ नोव्हेंबर २०१४ रोजी उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश दिला होता. मात्र, एकूण सहापैकी ४ नगरसेवकांनी आपला वेगळा गट करीत ११ नोव्हेंबरच्या उपाध्यक्ष निवडणुकीत सेनेच्या संजू साळवी यांना मतदान करून पक्षादेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ व ५ व त्याखालील नियमानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हा याचिका अर्ज मयेकर यांनी त्यांचे वकील भाऊ शेट्ये तसेच राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे दाखल केला आहे. (प्रतिनिधी)राजकीय समीकरणे बदलणार?नगरपालिकेत सध्या सेनेचे १३ व राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट केलेले ४ असे सेनेसोबतचे एकूण १७ सदस्य आहेत. तर भाजपाचे ८, राष्ट्रवादीचे २ व कॉँग्रेसचा एक असे ११ सदस्य भाजपकडे आहेत. भाजपाचे नगराध्यक्ष पालिकेत विराजमान आहेत. या स्थितीत चार सदस्यांचा वेगळा गट अपात्र ठरला तर चार जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ १३ होईल. त्याचबरोबर सेनेतील २ नगरसेवक राजीनामा देण्याची शक्यताही आहे. असे राजकीय समीकरण जुळले तर सेना व भाजपा पालिकेत प्रत्येकी ११ या संख्याबळावर येऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात निर्णय काय होतो, काय घडते यावरच पुढील समीकरणे अवलंबून आहेत.