शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोरिलासदृश प्राण्याचे थरारनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 23:56 IST

नेरूरमधील नागरिकांमध्ये भीती : घरावर उड्या मारल्याने छपराचे नुकसान

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर मेस्त्रीवाडी येथील महादेव मेस्त्री यांच्या घरावर गोरिलासदृश प्राण्यांनी उड्या मारत नुकसान केले. या प्राण्यांनी घराची कौले आणि पत्रे फोडून टाकले. दहा मिनिटे चाललेल्या या थरारामुळे घरातील व्यक्तींसह ग्रामस्थ भयभीत झाले असून, हे गोरिलासदृश केसाळ प्राणी बाजूच्याच जंगलात पळून गेले आहेत. नेरूर- मेस्त्रीवाडी येथील महादेव मेस्त्री यांच्या घराच्या छप्परावर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास केसाळ पाच ते सहा फूट उंची असलेल्या गोरिलासदृश माकडासारख्या दोन प्राण्यांनी उड्या टाकल्या. त्यामुळे घरावरील कौले व अंगणातील पत्रे खाली आले. सकाळच्या सुमारास मेस्त्री यांच्या घरातील महिला घरातून बाहेर पडताच हा गोरिलासदृश प्राणी पिल्लासह समोर आढळून आला. दरवाजा उघडला जाताच त्या प्राण्यांनी त्यांच्या अंगणातील छपरावर उडी घेतली असता, त्यातील एका प्राण्याचा पाय तिथे अडकला. त्यामुळे घाबरलेल्या त्या दोन्ही प्राण्यांनी कसाबसा पाय सोडवून सुटका केली आणि त्यानंतर पुन्हा घराच्या छपरावर उड्या घेतल्या. छपरावर या प्राण्यांनी उडी मारली. मात्र, या प्राण्यांचे वजन खूप असल्याने उडी मारलेल्या ठिकाणी छपराचा भाग तुटला. हे प्राणी घरावर उड्या मारीत असताना जोरदार आवाज करत होते. याठिकाणी आलेल्या या दोन प्राण्यांपैकी एक प्राणी मोठा तर एक छोटा होता. लहान असलेला प्राणी बहुधा पिल्लू असण्याची शक्यता मेस्त्री कुटुंबीयांनी वर्तविली. (प्रतिनिधी)अशा प्राण्यांची नोंद नाही : वनविभागनेरूरमध्ये आलेले ते प्राणी गोरिलासदृश असले तरी आपल्या जिल्ह्यात गोरीला किंंवा चिपांझी प्राणी असल्याची वन विभागाकडे नोंद नाही. तरीही योग्य पद्धतीने तपास करू, अशी माहिती वनविभागाने दिली. तसेच या प्राण्यांनी उड्या मारताना त्यांचे केस ठिकठिकाणी पडलेले आढळून आले. ते केस तपासणीकरिता पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचेही वनाधिकाऱ्यांनी सांगितले. आक्राळविक्राळ प्राणीहे प्राणी उंच आणि आक्राळविक्राळ व केसाळ होते. ते गोरीला, चिपांझीसारखे दिसत असल्याचीही माहिती मेस्त्री कुटुंबीयांनी दिली. नेरूरमध्ये आलेल्या या दोन्ही प्राण्यांमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमका कोण प्राणी आहे, याची माहिती व ओळख नसल्याने ग्रामस्थांमध्ये दिवसभर याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या.