शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

‘थिंक टँक’चा कोकणच्या उपयोगाबाबत विचार : प्रभू

By admin | Updated: August 31, 2014 00:29 IST

मालवण : देशातील विविध मंत्रालयांच्या नवनवीन योजनांच्या अंमलबजावणीपूर्वी माहिती एकत्रित करून त्यावर ठोस निर्णय घ्यावा

मालवण : देशातील विविध मंत्रालयांच्या नवनवीन योजनांच्या अंमलबजावणीपूर्वी माहिती एकत्रित करून त्यावर ठोस निर्णय घ्यावा व नंतरच त्या योजना पंतप्रधानांकडे सादर केल्या जाव्यात यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ‘थिंक टँक’ची संकल्पना मांडली आहे. याद्वारे पुढील पंधरा वर्षांसाठी ५० लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असून, या ‘थिंक टँक’चा कोकणासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार आपण करीत आहोत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले.गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरेश प्रभू हे मालवण या ठिकाणी आपल्या निवासस्थानी आले असता मनसेचे कोकण विभाग संघटक माजी आमदार परशुराम उपरकर, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार शिवराम दळवी, धीरज परब, नंदकिशोर सावंत व इतरांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी परशुराम उपरकर यांनी थिंक टँकच्या प्रमुखपदी सुरेश प्रभू यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. माजी आमदार परशुराम उपरकर आणि शिवराम दळवी यांच्याशी चर्चा करताना प्रभू म्हणाले, नियोजन मंडळाच्या धर्तीवर ‘थिंक टँक’चे काम असणार असून, त्याच्या कामाचा आवाका मोठा आहे. देशात केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती या ‘थिंक टँक’कडे येणार असून, त्यावर विचारविनिमय करूनच नंतर त्या योजना पंतप्रधानांकडे पाठविल्या जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याच्या दृष्टीने ‘थिंक टँक’ काम करणार असून, केंद्र सरकारचे धोरण ठरविण्यात थिंक टँकमधील सदस्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. याशिवाय विकासाच्या दृष्टीने राज्यांसाठी कोणते धोरण वापरायचे याचाही निर्णय ‘थिंक टँक’ घेणार आहे, अशी माहिती देत प्रभू यांनी पुढील १५ वर्षांसाठी देशाच्या विकासाचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने ५० लाख कोटी रुपयांची तरतूद या ‘थिंक टँक’मध्ये केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी उपरकर यांच्यासमवेत मनसे मालवण तालुकाध्यक्ष नारायण कुबल, भिवा शिरोडकर, शिवा भोजणे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)