शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांत मिरची पूड टाकून युवकास झाडाला बांधले

By admin | Updated: February 12, 2017 22:51 IST

वेताळबांबर्डे येथील घटना : युवक शिवसेना उमेदवाराचा भाचा; दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेना उमेदवार स्नेहा मिलिंद दळवी यांच्या प्रचारासाठी आलेला त्यांचा कोलगाव- भोमवाडी येथील भाचा अक्षय दीपक निवळे (वय १९) याच्या डोळ््यात मिरची पूड टाकून त्याचे हात-पाय बांधून त्याला झाडाला बांधून ठेवल्याची घटना वेताळबांबर्डेे येथे घडली आहे. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वेताळबांबर्डे पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार स्नेहा मिलिंद दळवी यांचा अक्षय हा भाचा असून, तो सध्या गोवा येथे असतो. तो स्नेहा दळवी यांच्या प्रचारासाठी वेताळबांबर्डे येथे काही दिवसांपूर्वी आला होता. शनिवारी स्नेहा दळवी या आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी निवजे येथे गेल्या होत्या. तर अक्षय हा घरी एकटाच थांबला होता. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अक्षय हा टी.व्ही. बघत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी अक्षयला हाक देत पिण्यासाठी पाणी मागितले. अक्षयने पाणी नेऊन दिले असता त्या दोघांनी अक्षयच्या तोंडावर पाणी फेकले. तसेच त्याच्या डोळ््यांत चटणी पूड फेकली व अंगाभोवती चादर गुंडाळून घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावरील जंगलातील झाडाकडे नेत त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांनी अक्षयच्या मोबाईलवरून स्नेहा दळवी यांना फोन लावला व अक्षयला बोलावयास सांगितले. त्यावेळी अक्षयने मावशीला रडत रडत सगळी हकिकत सांगितली. यानंतर त्या दोन अज्ञात व्यक्तींनी अक्षयला तिथेच बांधलेल्या अवस्थेत टाकून पलायन केले. अक्षयचा फोन येताच दळवी व कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवीत तातडीने वेताळबांबर्डे येथील घर गाठले व परिसरात अक्षयचा शोध घेतला असता घराशेजारील ५० मीटरच्या अंतरावर झाडाला टेकलेल्या स्थितीत व हात-पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत अक्षय आढळून आला. या घटनेनंतर घाबरलेल्या अक्षयला नीट बोलताही येत नव्हते. ाा जे काही घडले ते नीट सांगताही येत नाही. त्यामुळे त्याला बांधून ठेवणारे कोण होते हे मात्र समजू शकले नाही. या घटनेनंतर अक्षयच्या वेताळबांबर्डे येथील नातेवाइकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी मिलिंद दळवी यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती मिळावी याकरिता घटनास्थळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी जाऊन अधिक तपास केला. तसेच अक्षयकडे विचारणा केली. मात्र, घाबरलेल्या अक्षयला नीट असे काहीच सांगता आले नाही. त्यामुळे पोलिसांनाही तपासाची दिशा ठरवता येत नव्हती. तरीही पोलीस घडलेल्या प्रकारामुळे चांगलेच हादरले असून, उमेदवारांच्याच भाच्याच्याबाबतीत असा प्रकार घडल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)