शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

साठेच काँग्रेसमुक्त करतील

By admin | Updated: January 13, 2016 21:52 IST

प्रमोद रावराणे : वैभववाडी काँग्रेस तालुकाध्यक्षांवर पलटवार, भाजपमध्ये पक्षनिष्ठा महत्वाची

वैभववाडी : साठे आणि कंपनीच्या कारस्थानांना कंटाळून वर्षभरात अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडला असून उरली सुरली काँग्रेसही संपवून साठे वैभववाडी काँग्रेसमुक्त करतील, असे टीकास्त्र सोडत भाजपमध्ये पद देताना पक्षनिष्ठा तपासली जाते. पदासाठी नेत्यांची हुजरेगिरी करावी लागत नाही, असा पलटवार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी पत्रकाद्वारे काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांच्यावर केला आहे. रावराणे यांनी आमदार नीतेश राणेंवर केलेल्या टीकेला साठे यांनी उत्तर दिले होते. साठेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला रावराणे यांनी बुधवारी पत्रकाद्वारे उत्तर दिले. भाजपमध्ये कर्तृत्वावर पदे मिळतात. कोणाच्या शिफारशीने किंवा आदेशाने मिळत नाहीत. त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांची सहानुभूती मिळवण्यासाठी मी आमदार राणेंवर टीका केली. हे साठेंचे विधान हास्यास्पद आहे. मी २५ वर्षे भाजपात निष्ठेने काम करीत आहे. मी एकदाही पक्ष बदलला नाही आणि मरेपर्यंत बदलणार नाही. परंतु रोज पक्ष बदलणाऱ्या साठेंना पक्षनिष्ठा काय कळणार? उद्या आपण कोणत्या पक्षात असू याची त्यांना खात्री आहे का? असा सवाल रावराणेंनी केला आहे. मी विधानसभेला काम केले नाही हा जावईशोध लावणाऱ्या साठेंनी लोकसभेला नीलेश राणेंचा आणि तत्पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव साठेंनी ठरवून केला होता का? असा प्रश्न उपस्थित करीत पुतना मावशीच्या प्रेमाचे धडे साठे आपल्याच कार्यकर्त्यांना कसे देतात हे त्यांचे जवळचे सहकारी अनुभवत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत साठेंनी कशी मदत केली हे दिगंबर पाटीलच सांगू शकतील. साठेंच्या अकार्यक्षमतेमुळेच आमदार राणेंना महिनाभर वैभववाडीत तळ ठोकावा लागला होता. वैभववाडीत काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला हे अरविंद रावराणे, नासीर काझी, दिगंबर पाटील व विकास काटे यांचे श्रेय आहे. त्यात साठेंनी आपले योगदान काय याचे आत्मचिंतन करावे. रावराणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, भाजपचे नगरसेवक सज्जनराव रावराणे, सुचित्रा कदम, रवींद्र्र तांबे, सरिता रावराणे तसेच शिवसेनेचे नगरसेवक रोहन रावराणे, संतोष पवार हे काँग्रेसचेच क्रियाशील कार्यकर्ते होते. परंतु साठे व त्रिकुटाच्या मनमानीला कंटाळून त्यांना पक्षांतर करणे भाग पडले. भालचंद्र साठे आणि कंपनी सतत नेत्यांचे कान फुंकून कुरघोड्या करीत असल्यानेच नारायण राणे यांना जयेंद्र्र रावराणेंसारखा निष्ठावंत कार्यकर्ता गमावावा लागला. जयेंद्र रावराणे हे युतीचे तालुक्यातील नेते आहेत. त्यांच्यामुळेच विरोधी आठ नगरसेवक निवडून आले हे मान्य करतात. मग अशा नेत्याला पक्ष सोडण्यास कोणी भाग पाडले याचेही उत्तर साठेंनी द्यावे. (प्रतिनिधी) रावराणे : साठे मन की बात आवर्जून सांगाच ४आमदार नीतेश राणे यांनी निवडलेले स्विकृत नगरसेवक संताजी रावराणे, नगराध्यक्ष रवींद्र रावराणे तसेच जिल्हा बँकेचे निवडून आलेले संचालक दिगंबर पाटील ही नावे साठेंच्या मनाप्रमाणे की मनाविरुद्ध ही 'मन की बात' त्यांनी आवर्जून सांगावी. असे आव्हान देत आमदार राणे आणि सतीश सावंत यांचे एकमत करायला साठे कधी बसले होते त्याची माहिती साठेंनी आम्हाला द्यावी. आणि पुतना मावशीचे प्रेम काय असते ते आपल्या या दोन नेत्यांना विचारावे, असा सल्ला प्रमोद रावराणे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.