शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची तक्रार नसल्याने तपास नाही : काळे

By admin | Updated: July 16, 2014 23:16 IST

कोणतीही तक्रार नाही.

सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर झालेल्या दगडफेकीसंदर्भात त्यांनी आपल्याकडे कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा विषय येत नाही. तरीही कायदा व सुव्यवस्था विचारात घेता या संदर्भातील विचारपूस सुरु केली आहे, अशी माहिती ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काळे यांनी दिली.नीतेश राणे कणकवलीहून मालवणच्या दिशेने जात असताना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास कसाल-मालवण रस्त्यावर रानबांबुळी नाका येथे त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. यात एक किरकोळ जखमीही झाला होता. या संदर्भात बुधवारी पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात नीतेश राणे यांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. दगडफेकीचा प्रकार घडल्यानंतर नीतेश राणे यांच्यासह कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, नीतेश राणे यांनी याबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब लिहून दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था ध्यानात घेता त्या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली असून या संदर्भात विचारपूसही सुरु आहे.नीतेश राणे यांनी याठिकाणी बोलताना दोन संशयितांची नावे घेतली होती. त्या संदर्भात संबंधित तालुक्यातील पोलीस निरीक्षकांना ‘त्या’ दृष्टीने लक्ष ठेवण्यास कळविण्यात आले असल्याचेही काळे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, नीतेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवरील दगडफेकीच्या वृत्तानंतर जिल्ह्यातील सुमारे २०० कार्यकर्ते ओरोस पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि जोपर्यंत या प्रकरणातील संबंधितांना ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत आपण इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, राणे यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्याने रात्री अकराच्या सुमारास हे सर्व कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेले. (प्रतिनिधी)