शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये घराणेशाही नाही

By admin | Updated: December 13, 2015 01:12 IST

वर्षा भोसले : सावंतवाडीत निवासी शिबिर

सावंतवाडी : भाजप घराणेशाही विरहित पक्ष असून आमच्याकडे घराणेशाही चालत नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा स्वकर्तृत्वाने मोठा होत असतो. आपली सत्ता केंद्रात व महाराष्ट्रात आहे. तिचा वापर करून जनतेपर्यंत पोहचा, असे आवाहन भाजपच्या माजी सरचिटणीस वर्षा भोसले यांनी केले. त्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने माजगाव येथे आयोजित निवासी कार्यकर्ता प्र्रशिक्षण शिबिरात बोलत होत्या. यावेळी ठाण्याचे दीपक जाधव, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस राजन म्हापसेकर, श्यामकांत काणेकर, मनोज नाईक, मंदार कल्याणकर, शितल राऊळ आदी उपस्थित होते. ठाणे येथील दीपक जाधव यांनी पक्षावर केलेले गीत सादर करीत आता कार्यकर्त्यांनो जागे व्हा आणि एकसंघ भारत घडवूया, असे मार्गदर्शन केले. निवासी शिबिरातून पक्षाची ध्येयधोरणे शिका, त्यांचा वापर समाजासाठी करा. दिनदयाल उपाध्याय यांनी संघाचे काम करीत असताना सर्वांना विश्वासात घेत देश एकसंघ कसा राहील याचा पहिला विचार केला होता. मात्र, काँग्रेसने देशातील गरीब जनतेला नेहमीच गरिबीतच ठेवले, असा आरोपही यावेळी भोसले यांनी केला. भाजपचे सावंतवाडी विधानसभा निवडणुकीपुरते निवासी शिबिर दोन दिवस चालणार असून, या शिबिराचा समारोप रविवारी पक्षाचे नेते सतीश धोंड यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिबिराच्या प्रमुख वर्षा भोसले यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपण सत्तेत असल्याची जाणीव ठेवली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे. भाजप असा पक्ष आहे, तोच सर्वसामान्य तळागळातील कार्यकर्त्याला बळ देऊ शकतो. त्यामुळे आपले अनेक कार्यकर्ते मोठमोठ्या पदावर जाऊन बसले आहेत, असे सांगत आपल्या पक्षात घरणेशाही नसल्याचा टोला काँग्रेस व शिवसेनेला लगावला. शिबिरात रंगनाथ गवस, सुशांत पांगम, श्वेता कोरगावकर, अन्नपूर्णा कोरगावकर, अ‍ॅड. सुषमा खानोलकर, शैलेश तावडे, उमेश साळगावकर, महेश पांचाल, अमित परब, महेश सावंत सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी) ...यापुढे भाजप स्वतंत्रपणे लढेल : काळसेकर ४जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी भाजपची ध्येयधोरणे तसेच जिल्ह्यातील भाजपच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यापुढे भाजप स्वतंत्रपणे आपले काम करेल आणि जिल्ह्यात पक्षाला यश मिळवून देईल, असे सांगितले.