शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पुरातत्वीय वारसास्थळांमध्ये केळशीची प्राचीन वाळूटेकडीही नाही!

By admin | Updated: September 26, 2016 23:16 IST

कोकणची उपेक्षाच : हजारो वर्षांचा इतिहास जागतिक स्तरावर बेदखलच--पर्यटनदिन विशेष

चिपळूण : निश्चित कालमापन असलेली त्सुनामीनिर्मित जगातील एकमेव वाळूची टेकडी ठरलेल्या, पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित कोकण किनारपट्टीवरील दापोली तालुक्यातील केळशी येथील टेकडीचा समावेश, सध्या तिला पोहोचू लागलेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरातत्त्वीय वारश्यात होण्याची गरज आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसास्थळांमध्ये नॅरोगेज नेरळ -माथेरानची टॉयट्रेनवगळता हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही.गुहागरजवळच्या पालशेत गावी ९० हजार वर्षांपूर्वीची मानवनिर्मित हत्यारे त्यांना सापडली. केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत डॉ. मराठे यांना साधारणत: आठ हजार वर्षांपूर्वीचे मानवनिर्मित बांधकाम खोल समुद्रात सापडले. पणजीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला आहे.गुहागर - दापोली खाडी किनाऱ्यावर कर्दे गावी नवव्या शतकात बुडालेली पुरातन बोट मिळाली. जोग नदीच्या मुखाजवळ बिरवाडी गावात दहाव्या शतकातील घर मिळाले. गुहागरात प्राचीन असंख्य कालवे आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्रतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी जगभरातील समुद्रतळाचे सौंदर्य न्याहाळून कोकणात समुद्रतळाशी जगापेक्षा वेगळी समृद्धी असल्याचे सिद्ध केले आहे. वाळूच्या टेकडीचे केळशी गाव भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. गत दशकात डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कर्ब-१४ पद्धतीने कालमापन केले असता ११७० ते ११९० वर्षांपूर्वी काळ मिळाला आहे. केळशी येथे केलेल्या शोधनकार्यात काही भांडी, घडे आणि खापरं मोठ्या प्रमाणावर मिळाली. गोलाकार काचेच्या भांड्यांचे आणि काचेच्या पेल्यांचे तुकडे व बांगड्यांचे तुकडे सापडले. तीस वर्षे वयाच्या दोन माणसांच्या कवट्या आणि एका लहान बालकाचा सांगाडाही मिळाला. अशाच उत्खननात टेकडीच्या पायथ्याशी जेथे आज भरतीचे पाणी दीड मीटर उंचीपर्यंत येते, तेथे १.२ मी. व्यासाची जांभ्या दगडात बांधलेली विहीर आढळून आली आहे. या विहिरीच्या आत आणि आसपास मिळणाऱ्या खापरांवरून ही विहीर शिलाहार काळातील (इ.स. १०००) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पृष्ठवंशिय आणि पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची हाडे इथल्या शोधनकार्यात सापडली. त्यात पाळीव गुरे, म्हैस, हरिण, समुद्री कासव व मासे यांचा समावेश आहे. वाळूच्या टेकडीच्या माथ्यावर गाडल्या गेलेल्या दोन कवट्यांच्या जवळच तांब्याची सहा नाणी सापडली. ही नाणी चांगल्या स्थितीत असून त्या वरील मजकूरही सुस्पष्ट आहे. अल सुलतान अहमदशाह बिन अहमद बिन अल हसन अल बहामनी ८३७ असा मजकूर त्यावर आहे. त्यामुळे ही नाणी बहामनी सुलतान अहमदशाह पहिला यांनी हिजरी सन ८३७ म्हणजेच इ. स. १४३३ मध्ये वापरात आणलेली आहेत हे नक्की झाले. केळशी गावाचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो. सारे उल्लेख १६०१ नंतरचे आहेत. केळशी येथील विहिरीच्या पुराव्यावरून आणि आजूबाजूच्या पुरातत्त्वीय अवशेषावरून इ. स. १५ व्या शतकापर्यंत समुद्राची पातळी ही तीन ते चार मीटरने कमीच होती हे नक्की होते. ही सर्वच ठिकाणे बेदखल राहिली आहेत. (प्रतिनिधी)रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ऱ्हास समुद्र किनाऱ्यावरून रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ऱ्हास झाल्याची स्पष्ट भूमिका केळशीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर वर्तक यांनी मांडली आहे. केळशी खाडी, साखरी, आतगाव, आंबोलीमार्गे वेसवीकडे जातो. या जुन्या मार्गावरील गावांना मुख्य प्रवाहात या रस्त्यामुळे आणणे शक्य होणार होते.टेकडी निसर्गापुढे हतबलपुलाची जागा बदलली जाऊन उंची कमी झाली असती, पर्यायाने खर्च कपात झाली असती. परंतु वर्तमान वाळू टेकडीचा ऱ्हास करणारा, रेवस-रेड्डी रस्ता हा बेलेश्वर मंदिरापासून पश्चिमेकडे वळविला गेला.रस्ता अगदी घरांना लागून आला, घरांना धोका निर्माण झाला. रस्ता नेताना रस्त्याकरिता केवडा, मारवेल, सुरु या झाडांचे असलेले जंगल जेसीबीने मुळापासून नष्ट केले गेले.