शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देवगडच्या विकासासाठी एकविचाराने काम करण्याची गरज

By admin | Updated: July 3, 2016 23:04 IST

नीतेश राणे : देवगड येथे कोकण माती प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा सत्कार

देवगड : देवगडचा विकास करण्यासाठी आपण व्हीजन तयार केले असून ज्यावेळी देवगडला २४ तास पाणी मिळेल त्याचवेळी खऱ्या अर्थाने देवगडचा विकास झाला असे म्हणता येईल. यासाठी राजकीय चष्मा बाजूला ठेवून विकासाकडे बघण्याची गरज असून जामसंडे देवगडच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करणार नाही. तसेच स्थानिक विकासासाठी एकविचाराने खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे. देवगड जामसंडे शहरातील जनतेने काय चूक केली की, देवगड तालुका २९ वर्षे मागासलेला राहीला असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले. देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात कोकण माती प्रतिष्ठान देवगड व सिंंधुरत्न फाऊंडेशन सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, कोकणमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, प्रकाश राणे, डॉ. मिलिंद कुळकर्णी, अ‍ॅड. अविनाश माणगांवकर, बाळ खडपे, डॉ. सुनील आठवले, निशिकांत साटम, सभापती रवींद्र जोगल, संजय बोंबडी, चारूदत्त सोमण आदी उपस्थित होते. राणे म्हणाले की, २९ वर्षे देवगडचा विकास खुंटला असून हा आपणाला आता भरून काढायचा आहे. स्थानिक विकासाची तळमळ नसल्यानेच यापूर्वी असे कार्यक्रम झाले नाहीत. देवगड विकासासाठी पक्षविरहित संवाद साधण्यासाठी आपण आलो आहोत. येथील प्रश्न मांडण्याची तळमळ, विकासात्मक प्रश्न मांडण्याची जिद्द बाळगुन आपण काम करीत आहोत. केवळ घोषणाबाजी पेक्षा स्थानिक विकासाप्रती किती निष्ठा आहे हे महत्वाचे आहे. विकासासाठी दृष्टी बदलण्याची गरज आहे. पायाभूत सुविधाच नसतील तर आदर्श गाव कसा तयार होणार? स्थानिक प्रश्नासाठी जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्थानिक, मूळ प्रश्नांना विरोधक बगल देत वारंवार घोषणाबाजी करीत आहेत. आमचा पराभव करण्याची भाषा करून येथील आरोग्य, पाणी प्रश्न सुटणार आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी विमानतळाच्या विषयावरून पालकमंत्री दीपक केसरकर यांना तर मेट्रोच्या विषयावरून प्रमोद जठार यांच्यावर टिप्पणी केली. यावेळी देवगड जामसंडे शहर विकासावर निशिकांत साटम, दत्ता सामंत, डॉ. सुनिल आठवले, चारूदत्त सोमण, सुरेश सोनटक्के आदींनी आपली मते मांडली. यावेळी विविध मान्यवरांचा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाला. देवगडवरील संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरणही त्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रकाश गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन करून आभार श्रीजित मराठे यांनी मानले. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत संजीव राऊत, नीलेश जाधव अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. तर संजय धुरी व डॉ. सुनील आठवले यांना विभागून तृतीय क्रमांक दिला. विनायक अपराज व श्रेयशी शिरसाट यांना उत्तेजनार्थ मिळाला. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)