शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

जनतेची घरे उद्ध्वस्त करणारे प्रकल्प नको

By admin | Updated: November 5, 2014 00:04 IST

विनायक राऊत : उपवडे गावाला भेट, समस्या सोडविण्याचे आश्वासन

कुडाळ : ज्या प्रकल्पांपासून फायदा  नाही, जनतेची घरे उद्ध्वस्त होत असतील, येथील जनतेला त्रास होणार आहे, असे प्रकल्प या मतदारसंघात आणणार नाही. दत्तक घेतलेल्या शिवापूर गावाचा आदर्श गाव बनविताना येथील इतर गावांचाही विकास होण्याकडे विशेष लक्ष देईन, असे आश्वासन उपवडे येथील गावभेट सभेत खासदार विनायक राऊत यांनी दिले. खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील उपवडे गावाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, भाई देऊलकर, उपवडे येथील महादेव उर्फ आबा राऊळ, पांडुरंग दळवी, संजय कविटकर, अनिल वायंगणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत यांनी उपवडे गावची ग्रामदेवता श्री देवी पावणाई रवळनाथाचे दर्शन घेतले. याच मंदिरात सभा झाली. यावेळी उपवडे ग्रामस्थांनी राऊत यांच्यासमोर गावातील समस्या मांडल्या. उपवडे येथील रस्त्याची अवस्था बिकट आहे. येथील नदीनाल्यांवरील पूल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात पुलांवरून पाणी जाते. अशा घटनांमध्ये आतापर्यंत तिघेजण वाहून गेले आहेत. उपवडेवासीयांच्या समस्यांकडे सर्वानीच दुर्लक्ष केले आहे. किमान येथील रस्ते, पूल, एसटी बस फेऱ्या आदी सुविधा चांगल्या दर्जाच्या आणि सुरळीत मिळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नवीन कॉजवे तयार करण्यासाठी काही ठेकेदारांनी येथील ब्रिटिशकालीन मोऱ्या सुरूंग लावून फोडल्या. परंतु नवीन बांधलेले कॉजवेही मोकडळीस आले असल्याने जुन्या मोऱ्याच चांगल्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी खासदार राऊत म्हणाले, शिवापूरसह आजूबाजूच्या गावातील रस्ते आणि इतर आवश्यक बाजंूचाही विकास व्हावा, या उद्देशाने शिवापूर हे दुर्गम गाव दत्तक म्हणून घेतले आहे, असे स्पष्ट केले. यासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन यावेळी राऊत यांनी दिले. (प्रतिनिधी)उपवडेत खासदार पहिल्यांदाचयावेळी उपवडे गावचे ज्येष्ठ नागरिक विश्राम दळवी म्हणाले, देश स्वतंत्र होऊन साठ वर्षे उलटली. परंतु उपवडे गावात एकही खासदार किं वा आमदार आला नव्हता. उपवडे गावात येणारे राऊत हेच पहिले खासदार असून हा दुर्मीळ योग असल्याचे दळवी यांनी सांगितले.